Anshuman Lakkad : अंशुमनच्या विमानाने घेतली स्वयंचलित गगनभरारी

दहावीला असताना अंशुमनने ड्रोन तयार केले, ड्रोनच्या यशस्वी प्रयोगानंतर आता विना वैमानिक (स्वयंचलित) हवेत उडेल असे विमान तयार केले आहे.
Anshuman Lakkad
Anshuman Lakkadsakal

शिवाजीनगर - दहावीला असताना अंशुमनने ड्रोन तयार केले, ड्रोनच्या यशस्वी प्रयोगानंतर आता विना वैमानिक (स्वयंचलित) हवेत उडेल असे विमान तयार केले आहे. शेकडो प्रयोग केल्यानंतर अंशुमन या विद्यार्थ्यांला यश मिळाले. लहान असताना थ्री इडियट्स हा चित्रपट पाहून त्या चित्रपटातून नवनवीन प्रयोग करण्याची कल्पना त्याला सुचत गेली. अंशुमन हा गोखलेनगर येथे राहत असू भारती विद्यापीठ कॅालेज ऑफ इंजिनियरिंग लवळे येथे तीसऱ्या वर्षात शिकत आहे.

शिक्षकाच्या आपमानातून विज्ञानाची गोडी

माध्यमिक शिक्षण घेत असताना गणित विषयात कमी मार्क पडत असल्याने रागातून शिक्षक म्हणाले, 'तुझे पुढे काय होणार? हे घरी आल्यावर अंशुमनने वडिलांना सांगितले. वडिलांनी स्व:त अंशुमनला गणित शिकवायला सुरवात केली. त्यामुळे त्याचे गणित पक्के झाले व सोबत विज्ञानाचा पायादेखील भक्कम झाला.' भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यांचे पूर्ण स्पष्टीकरण गणिताच्या माध्यमातून असते. गणित चांगले समजल्यामुळे विज्ञानात गोडी लागली असे अंशुमनचे वडील योगेश लक्कड यांनी सांगितले.

विज्ञान प्रयोगातून ड्रोनची निर्मिती ते स्वयंचलित विमानाची गगणभरारी

शाळेत विज्ञान दिनानिमित्त नवीन प्रयोग करण्यासाठी अंशुमने पुढाकार घेतला. प्रचंड मेहनत घेतली व वडिलांची साथ मिळाली, या मेहनतीचे फळ मिळाले व ड्रोन अखेर हवेत उडाले. ड्रोनचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर वन विभागाच्या समस्या जाणून घेऊन ‘कृषी ड्रोन’ देखील तयार केले. कृषी ड्रोनच्या माध्यमातून वन क्षेत्राचा सर्हे करून देणे, उंच डोंगरावर जाऊन बियाने पेरणी करणे, कीटकनाशक फवारणी, आग आटोक्यात आणने अशा गोष्टी करून दाखवल्या.

अंशुमनने त्याच्या वडिलांच्या सांगण्यानुसार विमान बनवायला सुरुवात केली. पुठ्ठे आणून विमान बनवायचा प्रयोग सुरू झाला. परंतु हे विमान अयशस्वी झाले. अनेक प्रयत्न करून देखील विमान उडत नव्हते, विमानांचे पंखे, मोटर तुटली तरी देखील विमान उडेना. विमान उडवण्याचे कौशल्य आत्मसात केले, विमानात गरजेनुसार बदल केले. स्वयंचलित विमान गगनभरारी घेऊ लागले. या प्रयोगात आई, वडील, बहिण यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे अंशुमनने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com