सीमावर्ती भागात आता ‘अँटी ड्रोन’चा वापर

धोका वाढत असल्याने संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून प्रणाली विकसित
drone
dronesakal

पुणे : देशाच्या सीमावर्ती भागात ड्रोनचा (drone) धोका वाढत असल्याने हा धोका रोखण्यासाठी आता अँटी ड्रोन प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे (DRDO) मार्फत विकसित करण्यात आलेल्या या प्रणालीच्या उत्पादनासाठी आत्मनिर्भर भारत (India) या संकल्पनेंतर्गत खासगी उद्योगांना हे तंत्रज्ञान पुरविण्यात आले आहे. याबाबतची माहिती संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट (Ajay bhatt) यांनी लोकसभेत केशरीदेवी पटेल आणि कनकमल कटारा यांना लेखी उत्तरात दिली आहे. (Anti-drones used india border areas)

जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती अस्थिर करण्यासाठी दहशतवादी हिंसक कारवाया करतात. सुरक्षा दलांकडून सीमावर्ती भागात दहशतवाद्यांविरुद्ध कारवाया करण्यात येतात. मात्र सध्या देशाच्या सीमावर्ती भागावरही ड्रोनचा धोका निर्माण होत आहे. यामुळे देशाच्या सुरक्षेबरोबर सैनिकांच्याही सुरक्षेचा प्रश्‍न वाढला होता. यासाठी ‘डीआरडीओ’मार्फत विकसित करण्यात आलेल्या अँटी ड्रोन प्रणालीचा वापर हा नक्कीच चांगला पर्याय आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

पूर्वीच्या ड्रोन हल्ल्यांच्या घटना पाहता अशा प्रकारची प्रणाली पूर्वीच यायला हवी होती. पंजाब व जम्मू काश्मीरच्या भागात ही प्रणाली महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. देशाच्या विविध भागांमध्ये यांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. त्यासाठी जास्तीत जास्त उद्योग व स्टार्टअप जोडले तर नक्कीच मोठ्या प्रमाणात या प्रणालीचे उत्पादन करणे शक्य होईल. यामुळे नवोदित उद्योग आणि तरुणांनाही चांगली संधी उपलब्ध होईल.

- मेजर जनरल (निवृत्त) राजन कोचर, संरक्षण विश्र्लेषक

drone
...तर डेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक ठरणार; WHO चा इशारा

‘डीआरडीओ’ने विकसित केलेल्या या प्रणालीचा वापर गेल्या वर्षी ७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त करण्यात आला होता. हे तंत्रज्ञान भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या उद्योगास हस्तांतरित करण्यात आले आहे. लष्करातर्फे याची मागणी आहे. तसेच सध्या इतर खासगी उद्योगांनीदेखील या तंत्रज्ञानासाठी संपर्क साधला आहे. लवकरच इतर खासगी उद्योगांशीही लायसन्सिंग करार केले जातील.

- मयंक द्विवेदी, संचालक, डायरेक्टोरेट ऑफ इंडस्ट्री इंटरफेस अँड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट (डीआयआयटीएम)

drone
तुमच्यावर मोठी जबाबदारी; PM मोदींचा IPS प्रशिक्षणार्थींशी संवाद

कोठे होणार उपयोग

अँटी ड्रोन प्रणाली अनोळखी ड्रोन आणि मानव रहित हवाई वाहने (यूएव्ही) शोधून काढतात किंवा त्यास रोखतात. तसेच विमानतळ, संवेदनशील क्षेत्र, सार्वजनिक ठिकाणे, स्टेडिअम, मोठी लष्करी आस्थापने आणि रणांगण यासारख्या मोठ्या जागांची सुरक्षा करण्यासाठी यांचा वापर केला जाऊ शकतो. ही अँटी ड्रोन प्रणाली शत्रू ड्रोनचा शोध घेणे, त्याच्या तांत्रिक कार्यप्रणालीत अडथळे आणणे किंवा ड्रोन नष्ट करण्यासाठी सक्षम आहे. या प्रणालीची प्रात्यक्षिके लष्कर आणि इतर सुरक्षा दल व एजन्सींनाही दाखविण्यात आली आहेत.

  • ही प्रणाली तीन किलोमीटरपर्यंतचे सूक्ष्म (मायक्रो) ड्रोन शोधू शकते व त्याच्या कार्यप्रणालीला बंद करू शकते

  • एक ते अडीच किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य खाली आणण्यासाठी लेझरचा वापर

  • प्रणालीतील रडारद्वारे चार किलोमीटर परिघातील लक्ष्य शोधता येते

  • तर दोन किलोमीटर परिघातील अशा ड्रोनची यंत्रणा निकामी करता येते

  • एक किलोमीटर परिसरातील ड्रोन नष्ट करणे शक्य

  • देशाच्या पश्चिम आणि उत्तर भागात वाढलेल्या ड्रोन आधारित कृतींचा प्रभावीपणे सामना करू शकते

  • ड्रोनच्या धोक्यांना त्वरित ओळखून त्यास नष्ट करू शकते

दहशतवादी हल्ल्यांत शहीद झालेल्या जवानांची संख्या

वर्ष शहीदांची संख्या

२०१९ ८०

२०२० ६२

जून २०२१ पर्यंत १६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com