बारामतीत सलग तिसर्‍या दिवशी अतिक्रमणविरोधी कारवाई

मिलिंद संगई
बुधवार, 25 एप्रिल 2018

बारामती : नगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाईचा धडाका लावला आहे. आज सलग तिस-या दिवशी शहरातील इंदापूर रस्त्यावरील अतिक्रमणे काढून टाकली गेली. 

वाहतूक कोंडी व पादचा-यांना चालणेही मुश्किल करुन टाकणा-या अतिक्रमणांबाबत माध्यमांनी आवाज उठविल्यानंतर आता नगरपालिका प्रशासनानेही याची गंभीर दखल घेत कारवाई सुरु केली आहे. नवीन मुख्याधिकारी योगेश कडुसकर यांनीही कारवाईला पाठिंबा देत आज प्रशासनाला काही सूचना केल्या. 

बारामती बसस्थानकासमोरील अतिक्रमणे आज सुनिल धुमाळ तसेच राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील अतिक्रमण निर्मूलन विभागाने काढून टाकली. यात फळांचे गाडे, टप-या तसेच पदपथांवर सुरु असलेले व्यवसाय यांचा समावेश होता. अनेक ठिकाणी तर वर्षानुवर्षे जागा अडवून बिनदिक्कतपणे व्यवसाय सुरु होते. 

दरम्यान बारामती शहरातील अतिक्रमण विरोधी मोहिम ही सातत्याने चालणार असल्याची माहिती नगरपालिका सूत्रांनी दिली. व्यापारी तसेच जे व्यावसायिक सार्वजनिक ठिकाणी वाहतूकीला अडथळा होईल अशा जागी बसून व्यवसाय करतात किंवा अतिक्रमण करतात त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे सांगितले गेले. 

रस्ते रिकामे ठेवण्यावर भर
दरम्यान वर्दळीच्या ठिकाणचे रस्ते वाहतूकीसाठी खुले राहतील, रस्त्यांवर अतिक्रमण होणार नाही याची काळजी नगरपालिका प्रशासन घेत आहे. दरम्यान दुसरीकडे वाहतूक पोलिसांनीही अस्ताव्यस्त पार्किंग करणा-या वाहनांवर कारवाई सुरु केली आहे. जेथे पक्क्या स्वरुपाचे अतिक्रमण हे ते आता पुढील टप्प्यात पाडून जागा रिकामी करण्यावर हा विभाग भर देणार आहे.

Web Title: Anti encroachment drive in Baramati