esakal | मंचरला दोन हजार जणांची अँटीजन चाचणी; 90 जण पॉझिटिव्ह

बोलून बातमी शोधा

covid19
मंचरला आज दोन हजार जणांची अँटीजन चाचणी; 90 जण पॉझिटिव्ह
sakal_logo
By
डी. के. वळसे-पाटील

मंचर : मंचर शहरात झालेल्या कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. २१) सात ठिकाणी दोन हजार जणांची रँपिड अँटीजन चाचणी करण्यात आली. त्यापैकी ९० जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामध्ये मजूर व व्यापाऱ्यांचा समावेश आहे. मंचर शहरातील सहा वार्डामध्ये ग्रामपंचायत, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक, ग्रामपंचायत व पंचायत समितीचे पदअधिकारी अशा एकूण ८० जणांनी रँपिड अँटीजन चाचणी कामात सहभाग नोंदविला. ३०० जणांना प्रतिबंधात्मक लसीकरण डोस देण्यात आले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावीपणे लॉकडाउनची अंमलबजावणी करण्यात आली आहे. अशी माहिती सरपंच किरण राजगुरू व उपसरपंच युवराज बाणखेले यांनी दिली.

हेही वाचा: जुन्नर तालुक्यात ऑक्सिजन सिलेंडरची तीव्र टंचाई

कोरोनाचे प्राथमिक लक्षणे असलेल्या रुग्णांना अवसरी खुर्द येथील तंत्र निकेतन महाविद्यालयाच्या कोविड उपचार केंद्रात व आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या रुग्णांना मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. ज्यांना लक्षणे नाहीत पण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच एकांतात राहण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे ग्रामविकास अधिकारी के. डी. भोजने यांनी सांगितले.

दरम्यान रँपिड अँटीजन चाचणी केंद्रांना शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आंबेगाव तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, गटशिक्षण अधिकारी संचिता अभंग यांनी भेट देऊन पाहणी केली.

हेही वाचा: प्लाझ्मा तुटवडा रोखण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांना एफडीएचे आदेश