अन्वीच्या शस्त्रक्रियेसाठी अडीच लाखांची मदत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

पारगाव - अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील मेंदूच्या दुर्मीळ आजाराने ग्रस्त असलेल्या अन्वी गुरुनाथ फल्ले हिला शस्त्रक्रियेसाठी अनेकांची मदत मिळाली. ‘सकाळ’मध्ये याबाबत करण्यात आलेल्या आवाहनांनंतर अनेक दानशूरांनी मदतीचा हात पुढे केला. 

रुग्णवाहिकेवर चालक म्हणून काम करणाऱ्या गुरुनाथ फल्ले यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. त्यांच्या चार वर्षांच्या मुलीला मेंदूच्या आजाराचे निदान झाले. तिच्या मदतीसाठी वैयक्तीक, सामूहिक व संस्थांतर्फे अडीच लाख रुपये जमा झाले.

मुखमंत्री साह्यता निधीतूनही एक लाख रुपये मिळाले आणि तन्वीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. जणू अन्वीचा पुर्नजन्मच झाला असून, ती आता मैत्रिणीबरोबर खेळू-बागडू लागली आहे. 

ऑगस्ट २०१७ मध्ये पहिली शस्त्रक्रिया करून मेंदूवरील एक गाठ काढण्यात आली. या शस्त्रक्रियेला एकूण सात लाख रुपये खर्च आला होता. आता दुसरी गाठ काढण्यासाठी पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागणार आहे त्यासाठी सुमारे पाच लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. परंतु पैशाअभावी शस्त्रक्रिया लांबत चालली होती. जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष ॲड. विष्णू हिंगे यांनी ५१ हजार रुपयांची मदत दिली. 

खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या भैरवनाथ पतसंस्थेने २५ हजार रुपये, खेड तालुक्‍यातील ग्रामस्थांकडून १८ हजार रुपये, विद्या विकास मंदिर विद्यालयातील माजी विद्यार्थांकडून ३० हजार रुपये, अवसरी बुद्रुक प्राथमिक शाळेतील शिक्षकांकडून ११ हजार ५०० रुपये, ग्रामस्थांकडून ४६ हजार रुपये, तसेच बॅंक खात्यावर अनेकांनी ७० हजार रुपये जमा केले. असे एकूण अडीच लाख रुपये व मुखमंत्री साह्यता निधीतूनही एक लाख रुपये मिळाले.

Web Title: anvi falle surgery 2.5 lakh help