‘अपराध मीच केला’ पुन्हा रंगभूमीवर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

पुणे - मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीत लेखक, नाटककार, गीतकार म्हणून परिचित नाव म्हणजे मधुसूदन कालेलकर. त्यांच्या अनेक चित्रपट आणि नाटकांना रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. ‘अपराध मीच केला’ हे त्यांचे एक गाजलेले नाटक. १९६४ मध्ये  रंगभूमीवर आलेल्या या नाटकाची तब्बल ५२ वर्षांनंतर ‘किवि प्रोडक्‍शन’च्या माध्यमातून पुनर्निमिती होतेय.

नव वर्षात १ मार्च रोजी या नाटकाचे दोन प्रयोग होणार असून, ते ‘सकाळ सह्याद्री सुरक्षा कवच’च्या सभासदांसाठी विनामूल्य असणार आहेत.  

‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ व ‘करायला गेलो एक’ या दोन यशस्वी नाटकांनंतर किशोर सावंत आता विवेक नाईक यांच्या साथीने ‘अपराध मीच केला’ हे गाजलेले सलग तिसरे नाटक नव्या वर्षात प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. या नाटकाच्या नव्या संचाचे दिग्दर्शन विजय 

गोखले करीत आहेत. या नाटकातील ‘कमांडर अशोक वर्टी’ ही व्यक्‍तिरेखा त्याकाळी अभिनेते अरुण सरनाईक यांनी लोकप्रिय केली होती. नव्या संचात ही भूमिका प्रसिद्ध अभिनेते रमेश भाटकर साकारणार आहेत. त्यांच्यासोबत विजय गोखले, विघ्नेश जोशी, किशोर सावंत, संजय क्षेमकल्याणी, विलास गुर्जर, यश जोशी, सुमंत शिर्सेकर, सोनाली बंगेरा व निशा परुळेकर यांच्या भूमिका आहेत. या नाटकाचे १ मार्च रोजी दोन प्रयोग होणार आहेत. पहिला प्रयोग दुपारी १.१५ वाजता व दुसरा प्रयोग सायंकाळी ५ वाजता बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे. कार्यक्रमाचे प्रायोजक ‘लोटस खाकरा शबरी खाकरा’ हे आहेत.

सभासदांसाठी सूचना  
सभासदांसाठी व कुटुंबीयांतील एका व्यक्तीला प्रवेश विनामूल्य
मोबाईल क्रमांक ९०७५०१११४२ वर सकाळी ११ पासून प्रवेश नोंदणी करू शकता तसेच ७७२१९८४४४२ या क्रमांकावर व्हॉट्‌सॲप करून देखील नावनोंदणी करू शकता 
नाटकाच्या प्रयोगाची वेळ सांगून नोंदणी करणे आवश्‍यक 
नोंदणीत दिलेल्या वेळेच्या प्रयोगाला उपस्थित राहणे बंधनकारक  
कार्यक्रमाच्या १५ मिनिटे आधी प्रवेश दिला जाईल. 
सभासदांनी कार्यक्रमासाठी ओळखपत्र, माहिती पुस्तिकेतील सातव्या क्रमांकाची प्रवेशिका व सभासद कार्ड आणणे आवश्‍यक 
दोन्ही प्रयोगांतील काही जागा राखीव असतील

Web Title: aparadh mich kela drama