
Pune Market Yard
Sakal
मार्केट यार्ड : यशवंत सहकारी साखर कारखान्याची जमीन खरेदी करताना संबंधित सर्व वित्तीय संस्थांची देणी, बोजा, मोजणी, जमीन ताबा आदी सर्व कायदेशीर बाबींची तपासणी करूनच व्यवहार करण्याचे मंगळवारच्या मासिक बैठकीत ठरले. मात्र या बैठकीतील सभेचा वृत्तांत तयार होण्यापूर्वीच बाजार समितीने सुमारे ३६ कोटी ५० लाख यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या खात्यावर वर्ग केल्याचे समोर आले आहे. या संदर्भात न्यायालयात दावा प्रलंबित असून उद्या (ता. २६) सुनावणी आहे.