esakal | अपूर्वा गोसावीने जिंकली महाराष्ट्र हेल्थ हॅकाथॉन 2021 स्पर्धा
sakal

बोलून बातमी शोधा

apoorva gosavi

अपूर्वाने जिंकली महाराष्ट्र हेल्थ हॅकाथॉन 2021 स्पर्धा

sakal_logo
By
जनार्दन दांडगे, उरुळी कांचन

उरुळी कांचन (पुणे) : महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या वतीने 23 ते 25 एप्रिल या दरम्यान घेण्यात आलेली "महाराष्ट्र हेल्थ हॅकाथॉन (एमएच 2)" ही स्पर्धा लोणी काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या एमआयटी स्कूल ऑफ बायोइन्जिनियरिंग सायन्स आणि रिसर्च विभागाची विद्यार्थिनी अपूर्व गोसावी हिने जिंकली आहे. आरोग्य खात्यात येणाऱ्या मुख्य आव्हानांना तोंड देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून अभिनव उपाय सुचविणेसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. दरम्यान, या स्पर्धेत हायपोथर्मियापासून अर्भकांना वाचविण्याच्या उद्देशाने नवजात जन्माच्या डिव्हाइसच्या नवकल्पना या प्रस्तावासाठी हॅकेथॉनच्या ट्रॅक डी मेडिकल डिवाइसेस या प्रकारात हा पुरस्कार अपूर्व गोसावी हिने जिंकला आहे. याव्यतिरिक्त अपूर्वा हिने संघाचा लोगो आणि विषय सादरीकरणाची रचनाही या स्पर्धेत केलेली होती.

हेही वाचा: जुन्नर : आचाऱ्याचा खून करणारा अल्पवयीन मुलगा गुन्हे शाखेच्या ताब्यात

स्पर्धा जिंकल्यानंतर अपूर्वा म्हणाली, "आरोग्य आणि व्यवसाय व्यवस्थापन क्षेत्रातील सर्वोत्तम मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली मानवतेच्या आणि परवडण्याजोगे आरोग्यसेवेचे एकात्मिक ध्येय मिळविण्याच्या उद्देशाने आम्ही सर्वांनी काम केले. एकंदरीत माझ्यासाठी हा एक विलक्षण अनुभव होता. आम्ही तयार केलेले डिवाइस आरोग्य सेवेसाठी महत्वाचे ठरणार आहे. या संशोधनासाठी मला माझ्या विभागाच्या प्रमुख डॉ. रेनू व्यास आणि माझ्या सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.'' दरम्यान, दुसरीकडे याच विद्यापीठाची विद्यार्थिनी अणू ओसवालने हिनेही कोपनहेगन बायोइन्फॉर्मेटिक्स हॅकाथॉन 2021 या ऑनलाईन स्पर्धेत मेंटरचा निवड पुरस्कार तसेच पीपल चॉईस पुरस्कारही जिंकला. आयआयटी दिल्लीच्या दोन टीम सदस्यांसह तिने सीएनएनचा आणि आरएनएन वापर करून एक सखोल शिक्षण मॉडेल तयार केले आहे. या मॉडेलचा वापर टी सेल्सच्या संभाव्य लक्षणाचे भाकित करून लसी विकास आणि कर्करोग प्रतिरोधक क्षमतेच्या क्षेत्रासाठी केला जाणार आहे.

हेही वाचा: पुणे शहरातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला ११ एप्रिलपासून ओहोटी सुरू

loading image