मला आमदारकी लढवायचीय - जगदाळे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

वालचंदनगर - ‘‘मला पुणे जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष वगैरे व्हायचे नाही, मला आमदारकी लढवायची आहे,’’ अशा शब्दांत इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी आपण विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगितले.  

श्रावण सोमवारनिमित्त आज निरवांगी (ता. इंदापूर) हद्दीतील दगडवाडी येथील नंदिकेश्‍वराची महापूजा व अभिषेक सभापती जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आला. पूजेनंतर मंदिरात छोट्याखानी सभेचे आयोजन केले होते. प्रास्ताविकात बाळकृष्ण कुलकर्णी यांनी सभापती जगदाळे यांना तुम्ही जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष व्हावे, तर सुभाष पोळ यांनी आमदारकीचे तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न करावा. आम्ही सर्वजण प्रचाराची धुरा सांभाळणार असल्याचे सांगितले. 

सत्काराला उत्तर देताना जगदाळे म्हणाले, ‘‘मला जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष वगैरे व्हायचे नाही, तालुक्‍याच्या विकासासाठी मला आमदारकी लढवायची आहे.’’ 
दरम्यान, जगदाळे यांनी प्रथमच आमदारकीची निवडणूक लढविण्याची जाहीर इच्छा व्यक्त केली आहे. या वेळी निरवांगीचे माजी सरपंच दशरथ पोळ, दत्तात्रेय पोळ, अजिनाथ कांबळे, दादासाहेब काळे, दादासाहेब सूळ, विठ्ठल पवार, ज्ञानदेव साळुंके, बबन रासकर उपस्थित होते.

Web Title: Appasaheb Jagdale Mla Election Politics