मंचरकरांनो, गणेश मूर्तीचे विसर्जन घोड नदीत करू नका; प्रशासनाचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

manchar.jpg

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर परिसरातील 28 सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्ती व दोन हजार घरगुती मूर्तींचे विसर्जन मंचर ग्रामपंचायत व प्रशासनामार्फत केले जाणार आहे.

मंचरकरांनो, गणेश मूर्तीचे विसर्जन घोड नदीत करू नका; प्रशासनाचे आवाहन

मंचर (पुणे) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर परिसरातील 28 सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्ती व दोन हजार घरगुती मूर्तींचे विसर्जन मंचर ग्रामपंचायत व प्रशासनामार्फत केले जाणार आहे. गणेश मूर्ती ट्रॅक्‍टरमार्फत जमा करून त्यांचे एकत्रितपणे घोड नदीत विसर्जन केले जाणार आहे. 

अन् अजित पवारांसमोरच फडणवीस म्हणतात, माझा आवाज...

मंचर (ता. आंबेगाव) ग्रामपंचायत सभागृहात शुक्रवारी गणेश मंडळाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे अधिकारी यांची बैठक झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे, जिल्हा परिषद सदस्या अरुणा थोरात, पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, मंचरचे प्रशासक जयराम लहामटे, माजी सरपंच बाळासाहेब बाणखेले, लक्ष्मण थोरात, राजू इनामदार, अल्लू इनामदार, अरुण बाणखेले आदी उपस्थित होते. 

... अन् मालकाच्या प्रेमापोटी बैलाने गिळलेले सोने केले परत

खराडे म्हणाले, ""सार्वजनिक गणेश मंडळांनी व नागरिकांनी गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी मंचर पोलिस ठाणे किंवा ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा. विसर्जनाच्या दिवशी घोड नदीवर फक्त प्रशासन व ग्रामपंचायतीने नियुक्ती केलेल्या स्वयंसेवकांना परवानगी राहील.''  बाळासाहेब बाणखेले व राजाराम बाणखेले म्हणाले, ""मंचरमध्ये कोरोनाचे एकूण 327 रुग्ण आढळून आले असून 187 जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी घोड नदीवर विसर्जनासाठी जाऊ नये.'' 
 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गणेश विसर्जनानिमित्त नागरिकांनी एकत्र येऊ नये. शासनाच्या निर्देशाप्रमाणे नागरिकांनी घरीच गणपती विसर्जन करावे. ज्यांना हे शक्‍य नसेल त्यांनी ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिलेल्या ट्रॅक्‍टरमध्ये आरती करून गणेश मूर्ती ठेवाव्यात. ग्रामपंचायतीमार्फत विसर्जन विधिपूर्वक केले जाईल. 
-रमा जोशी, तहसीलदार, आंबेगाव