Voter List
Voter ListSakal

मतदारांना इ-मतदार ओळखपत्र डाऊनलोड करण्याचे आवाहन

मतदारांनी मोबाईल क्रमांक नोंदविलेली यादी सी-डॅक संस्था उपलब्ध करणार आहे.

पुणे : २५ सप्टेंबर २०२० ते १५ जुलै २०२१ या कालावधीत नोंदणी केलेल्या मतदारांनी इ-मतदार ओळखपत्र (e-EPIC) डाऊनलोड करावे, असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी केले आहे. त्यासाठी १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी १२ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

Voter List
साहसी पर्यटन धोरणास अंमलबजावणी होणार का?;पाहा व्हिडिओ

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२१ पूर्वी आणि त्यानंतर मतदार नोंदणी करताना मोबाईल क्रमांक नोंदविलेले मतदार इ-मतदार ओळखपत्र डाऊनलोड करण्यास पात्र आहेत. मतदारांनी मोबाईल क्रमांक नोंदविलेली यादी सी-डॅक संस्था उपलब्ध करणार आहे. इ-मतदार ओळखपत्र डाऊनलोड करण्यासाठी एकाच तासाचा कालावधी असून, त्याबाबत दक्षता घ्यावी असे आयोगाचे निर्देश आहेत, असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी सावंत यांनी सांगितले.

Voter List
रुपीच्या ठेवीदारांसाठी अर्थमंत्र्यांना साकडे

इ-मतदार ओळखपत्राचे नागरिकांना फायदे

  1. डिजिटल स्वरुपात निवडणूक छायाचित्र ओळखपत्र मिळवण्याचा पर्यायी आणि वेगवान प्रकार

  2. मतदार ओळखीसाठी दस्तऐवजाचा पुरावा म्हणून वैध

  3. मतदाराच्या सोयीनुसार छापणे शक्य

  4. मतदानादरम्यान पुरावा म्हणून वापरणे शक्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com