तुम्हाला माहिती आहे का सफरचंदाची आवक कोणकोणत्या देशातून होते?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

परदेशातून येणाऱ्या सर्वच फळांवर सीमा शुल्क वाढविले आहे; तसेच अावक कमी आणि मागणी जास्त असल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १० ते २० टक्‍क्‍यांनी सफरचंद महाग आहेत.
- सलीम बागवान, व्यापारी, मार्केट यार्ड

मार्केट यार्ड - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात सध्या परदेशी सफरचंदांचा हंगाम सुरू झाला आहे. भारतातील सफरचंदांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. तुर्की, इराण, वॉशिंग्टन, पोलंड, बेल्जियम, न्यूझलंड, चीली, स्पेन येथून सफरचंद बाजारात मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सफरचंद खायला गोड, रंगाने लाल आणि दिसायला आकर्षक असते; तसेच आरोग्यासाठी गुणकारी समजले जाते. त्यामुळे सफरचंदाला वर्षभर मागणी असते. सध्या बाजारात तुर्की, इराणी, पोलंडच्या सफरचंदाला मोठी मागणी आहे. किरकोळ बाजारात सफरचंदाला दर्जानुसार १२० ते १८० रुपये किलो भाव मिळत आहे. डिसेंबर ते मार्च यादरम्यान परदेशी फळांचा हंगाम असतो. यामध्ये इराण आणि तुर्कीचे सफरचंद मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होतात.

पुण्यात मानसी नाईकचा विनयभंग

सध्या बाजारात विविध देशांतून दररोज ४० ते ५० टन सफरचंद बाजारात येतात; तर रविवारी साधारणतः ६० टन सफरचंद बाजारात दाखल होते. पुणे शहर, उपनगरे, दौंड, बारामती, महाबळेश्वर, वाई, सांगली, पाचगणी, हुबळी, बेळगाव, सोलापूर, नगर, सातारा या भागातून मोठी मागणी असल्याची माहिती मार्केट यार्डातील सफरचंदाचे व्यापारी सलीम बागवान यांनी दिली. सध्या बाजारात देशी फळे उपलब्ध नाहीत. त्यामुळे सफरचंदासह सर्व प्रकारच्या परदेशी फळांना मोठी मागणी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: apple in market yard by iran poland and spain