दहावीच्या फेरपरीक्षेसाठी 14 जूनपासून अर्ज भरता येणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 जून 2018

पुणे : दहावी-बारावीमध्ये दोन विषयांत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठीची लेखी परीक्षा 17 जुलैपासून सुरु होणार आहे. या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक, श्रेणी आणि तोंडी परीक्षा 9 ते 16 जुलैमध्ये होणार आहे. दहावीच्या फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 14 जूनपासून अर्ज भरता येणार आहे.

परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक "www.mahahsscboard.maharashtra.gov.in' या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट 2018मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या फेरपरीक्षेचे वेळापत्रक राज्य मंडळाने सोमवारी जाहीर केले. 

फेरपरीक्षेचा तपशील : लेखी परीक्षा कालावधी 
दहावी : 17 जुलै ते 2 ऑगस्ट 2018 
बारावी (सर्वसाधारण विषय) : 17 जुलै ते 4 ऑगस्ट 2018 
बारावी (व्यवसाय अभ्यासक्रम-नवीन) : 17 जुलै ते 2 ऑगस्ट 2018 

विद्यार्थ्यांसाठी सूचना : 
- मंडळाच्या संकेतस्थळावरीील वेळापत्रकांची सुविधा फक्त माहितीसाठी आहे. 
- परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय येथे विभागीय मंडळामार्फत दिलेले वेळापत्रक अंतिम असेल. 
- छापील वेळापत्रकावरुनच परीक्षेच्या तारखांची खात्री करुन घ्या 
- राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाशिवाय, अन्य यंत्रणेने किंवा सोशल मिडियाद्वारे व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरु नये.

Web Title: application for the revision of Class X will be available from June 14