मुळशी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीबाबत महत्वाचे अपडेट

गोरख माझिरे
Thursday, 14 January 2021

मुळशी तालुक्यात शुक्रवारी (ता. १५ ) होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या मतदान प्रक्रियेसाठी सुमारे आठशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, २२२ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत.

कोळवण : मुळशी तालुक्यात शुक्रवारी (ता. १५ ) होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या मतदान प्रक्रियेसाठी सुमारे आठशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, २२२ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा तहसीलदार अभय चव्हाण यांनी दिला आहे.

पुणेकरांच्या खिशाला कात्री; का होतेय पेट्रोल- डिझेलच्या भावात वाढ?

मुळशी तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने ११ डिसेंबरला जाहीर केला आहे. ग्रामपंचायतींच्या ३९१ जागांपैकी १६४ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये कोळवण, लवळे, काशिग, बोतरवाडी, भालगुडी, आंबेगाव, भोईनी, मुठा आणि नानेगाव अशा नऊ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित ३६ ग्रामपंचायतींच्या २२२ जागांसाठी  शुक्रवारी मतदान होणार आहे.  त्यासाठी ५१५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पाच जागा या रिक्त असुन  शुक्रवारी होणाऱ्या मतदानासाठी १४१ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. यांत सुमारे ७१३१० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

गुरुवारी (ता . १४) संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे मतदान यंत्रे व मतदानाचे इतर साहित्य सुपूर्द केले असुन पोलिस बंदोबस्तासह त्यांची नेमून दिलेल्या गावांकडे रवानगी करण्यात आली आहे. अशी माहिती तहसिल कार्यालयाचे लिपिक किरण साळवी यांनी दिली. 

मराठ्यांच्या ध्येयाचा पानिपतमध्ये विजय

मतदान प्रक्रियेसाठी सुमारे आठशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रत्येक मतदान केंद्रात एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, एक शिपाई व एक पोलिस कर्मचारी असे सहा जणांचे पथक राहणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कोविड १९ विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार अभय चव्हाण यांनी दिली आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appointment of about 800 staff for the grampanchayat voting process in mulshi taluka