Pune NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी जुबेर बाबु शेख यांची नियुक्ती

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी जुबेर बाबु शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Zubair Babu Shaikh
Zubair Babu Shaikhsakal
Summary

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी जुबेर बाबु शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कॅन्टोन्मेंट - पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी जुबेर बाबु शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते नुकतेच नियुक्तीपत्र देण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार आपल्या पक्षाची विचारधारा व तत्त्वाचे केंद्रस्थानी ठेवून पक्षाच्या विस्तारार्थ आणि संघटना वाढवण्यासाठी जुबेर शेख यांची निवड करण्यात आली.

जुबेर बाबू शेख हे शहर चिटणीस म्हणून केलेल्या उल्लेखनीय कामगिरी पाहून त्यांची शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे शहरातील झोपडपट्टी भागात जुबेर बाबू शेख यांची कार्य असून, त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले आहे.

पक्षाने दिलेली जबाबदारी आणि टाकलेला विश्वास पात्र ठेवण्याचा प्रयत्न करू. पक्ष संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे शेख यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवा अध्यक्ष किशोर कांबळे, अन्वर खान, शब्बीर बागवान, इस्माईल छप्परबंद, असलम बागवान, इम्रान बागवान, फारुक शेख उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com