esakal | जुन्नरला शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकाजवळ हायड्रॉलिक्स शिडीस मान्यता
sakal

बोलून बातमी शोधा

approved hydraulic ladder near Shivaji Maharaj equestrian monument at Junnar

शिवजयंती व अन्य उत्सवाच्या निमित्ताने या पुतळ्यास शिडीअभावी पुष्पहार अर्पण करणे शिवप्रेमींना शक्य होत नसे यामुळे येथे शिडी उभारावी अशी गेली अनेक वर्षापासूनची शिवप्रेमींची मागणी होती ती आता लवकरच पूर्ण होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जुन्नरला शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकाजवळ हायड्रॉलिक्स शिडीस मान्यता

sakal_logo
By
दत्ता म्हसकर

जुन्नर (पुणे) : किल्ले शिवनेरीकडे जाणाऱ्या जुन्नर येथील पंचलिंग चौकातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकाजवळ हायड्रॉलिक्स शिडी बसवण्यासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मान्यता दिली असल्याची माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

शिवजयंती व अन्य उत्सवाच्या निमित्ताने या पुतळ्यास शिडीअभावी पुष्पहार अर्पण करणे शिवप्रेमींना शक्य होत नसे यामुळे येथे शिडी उभारावी अशी गेली अनेक वर्षापासूनची शिवप्रेमींची मागणी होती ती आता लवकरच पूर्ण होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिवजन्मभूमीतील शिवभक्तांच्या या  प्रलंबित  प्रश्नासाठी आमदार बेनके यांनी सोमवारी (ता.१९) रोजी जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावला. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी गृहविभाग, सावर्जनिक बांधकाम विभाग, नगर पालिका प्रशासन यांना निर्देश दिले असून लवकरच या कामास सुरुवात होईल.

पुणेकरांनो, बक्षीस हवंय? मग, शोधा चोरीला गेलेला बसस्टॉप!"

या कामासाठी आमदार फंडातून निधी देण्यास मान्यता दिली आहे. त्याबाबतचे पत्र देखील यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना यांना दिले असल्याचे बेनके यांनी सांगितले.