जेजुरीत ग्रामीण रुग्णालयासाठी अद्ययावत मॉडूलर ऑपरेशन थिअटर मंजूर

modular operation theater
modular operation theater

जेजुरी - जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयासाठी १ कोटी ९९ लाख रुपये खर्चाच्या मॉडयूलर ऑपरेशन थिएटरच्या कामासाठी मंजूरी मिळाली  असल्याची माहीती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रबंध भिसे यांनी दिली. त्यामुळे सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी हे रुगणालय उपयुक्त ठरणार आहे. पुरंदर तालुक्यातील शासकीय रुग्णालयात पहिलीच अशी सुविधा निर्माण होणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे,आमदार संजय जगताप यांच्या प्रयत्नातून सुमारे एक कोटी ९९ लाख रुपयांचे अद्ययावत असे ऑपरेशन थिअटर ग्रामीण रुग्णालयासाठी मंजुर झाले असुन लवकरच जेजुरीकरांना त्याचा लाभ होणार असल्याचे ग्रामीण रुगणालयाच्या रुग्णकल्याण समितीच्यावतीने सांगण्यात आले. 

हे ऑपरेशन थिअटर हे पुर्णतः निर्जुंतक असणारे व सर्व सोयी सुविधांनी अद्ययावत असे असणार आहे. मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाप्रमाणे येथे अनेक सोयी असणार आहेत. भविष्य काळात जेजुरी शहर व परिसरातील रुग्णांच्या हृद्य, मेंदू, मणका अशा प्रकारच्या सर्जरीसाठी हे हॉस्पीटल उपयोगी ठरणार आहे.

पुरंदर तालुक्यात यापुर्वी अशी सुविधा नव्हती. ग्रामीण रुग्णालयात ऑपरेशन थिअटर सुविधा उपलब्ध होईल अशी माहीती नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांनी दिली. उपनगराध्यक्ष गणेश निकुडे, गटनेते सचिन सोनवणे, मुख्याधिकारी पूनम कदम, रुग्ण कल्याण समितीचे डॉ.प्रमोद वाघ, हरिदास रत्नपारखी, अनंत देशमुख, संतोष खोमणे, दादा मुलाणी, किरण दावलकर, डॉ.विजय सम्राट, डॉ. महेश समराम, डॉ.साळवी आदी यावेळी उपस्थित होते. 

रुग्ण कल्याण समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे व आमदार संजय जगताप यांचे विशेष आभार यावेळी मानल्याचे हरिदास रत्नपारखी यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com