भोसरीतील पीएमटी चौकात खासगी वाहनचालकांची मनमानी

भोसरी - येथील राजमाता जिजाऊ उड्डाण पुलाखालील पीएमपीसाठी राखीव असलेल्या जागेत खासगी वाहने लावण्यात येतात.
भोसरी - येथील राजमाता जिजाऊ उड्डाण पुलाखालील पीएमपीसाठी राखीव असलेल्या जागेत खासगी वाहने लावण्यात येतात.

भोसरी - येथील राजमाता जिजाऊ उड्डाण पुलाखाली पीएमटी चौकाजवळ पीएमपीच्या बससाठी राखीव असलेल्या गाळ्यात खासगी वाहने लावली जात असल्याने बसला जागा उपलब्ध होत नाही. पीएमपी चालकांना रस्त्यावरच बस उभ्या कराव्या लागतात. त्याचप्रमाणे बस वळविण्यासाठी पुरेशी जागा मिळत नसल्याने बस वळवताना वाहतूक कोंडीतही भर पडत आहे. 

या ठिकाणी लावण्यात येणाऱ्या खासगी वाहनांवर कारवाईची मागणी वाहनचालकांमधून होत आहे. भोसरीतील पीएमटी चौकाजवळ राजमाता जिजाऊ उड्डाण पुलाखाली पीएमपी बसला थांबण्यासाठी त्याचप्रमाणे वळण्यासाठी राखीव गाळा ठेवण्यात आला आहे. 

मात्र, गाळ्याचा निम्मा भाग खासगी वाहनांनी व्यापला आहे. त्यामुळे बससाठी जागा शिल्लक राहत नसल्याने चालकांना रस्त्यावरच बस उभ्या कराव्या लागतात. त्याचप्रमाणे पुणे-नाशिक महामार्गांच्या दोन्ही बाजूंच्या सेवा रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दी असल्याने रस्त्यावर थांबविलेल्या बसमुळे काही वेळ वाहतूक कोंडीही होते. या गाळ्यालगतच्या नाशिक- पुणे महामार्गाच्या सेवा रस्त्यावर तीन आसनी प्रवासी रिक्षाही थांबतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com