

Arctic Antarctic Ice Extent News NASA Satellite Data Reveals Below Average Polar Ice Coverage in Both Hemispheres in 2026
sakal
पुणे : यंदाच्या हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात उत्तर ध्रुवीय प्रदेश (आर्क्टिक) आणि दक्षिण ध्रुवीय प्रदेशातील (अंटार्क्टिक) बर्फाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहिल्याची नोंद अमेरिकी अवकाश संशोधन संस्थेने(नासा) घेतली आहे. दरवर्षी मार्च आणि सप्टेंबरमध्ये या नोंदी घेतल्या जातात. यावर्षी आर्क्टिकच्या उन्हाळ्यात दहाव्या क्रमांकाच्या, तर अंटार्क्टिकच्या हिवाळ्यात तिसऱ्या क्रमांकाच्या नीचांकी बर्फाची नोंद झाली.