esakal | मराठीच्या 'या' बोलीभाषा माहिती आहेत का?
sakal

बोलून बातमी शोधा

This are colloquial language of Marathi

'मराठी'ला इतिहास अडीच हजार वर्षांपूर्वीचा! जगातील 12 देशांतील तज्ज्ञांकडून मराठीच्या या प्राचीनतेचे पुरावे मान्य केले आहेत.  मराठी भाषेतून जवळपास 17 बोलीभाषांची निर्मिती झाली आहे.

मराठीच्या 'या' बोलीभाषा माहिती आहेत का?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मराठी भाषा दिन: पुणे : केंद्र सरकारने तमीळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन 16 वर्षे पूर्ण होत आहेत. मराठीला हा दर्जा देण्याचा प्रस्ताव मात्र अजूनही सरकार दरबारी प्रलंबित आहे.  संस्कृत, तमीळ, कन्नड, तेलुगू, उडिया, मल्याळम या भाषांना अभिजात दर्जा मिळाला. पण आपली समृद्ध आणि सुंदर अशी 'मराठी' भाषा आज अभिजात असूनही तो दर्जा तिला मिळाला नाही... असे का? मराठी ही जगातील पंधरावी आणि भारतातील चौथ्या क्रमांकाची भाषा आहे. आज मराठी भाषा बोलणाऱ्यांची एकूण लोकसंख्या 9 कोटी इतकी आहे.

'मराठी'ला इतिहास अडीच हजार वर्षांपूर्वीचा! जगातील 12 देशांतील तज्ज्ञांकडून मराठीच्या या प्राचीनतेचे पुरावे मान्य केले आहेत.  मराठी भाषेतून जवळपास 17 बोलीभाषांची निर्मिती झाली आहे.

या आहेत मराठी बोलीभाषा  
अहिराणी (जळगाव, बुलढाणा, मलकापूर, बऱ्हाणपूर, शहापूर),
इस्रयली मराठी,
कोंकणी (मालवण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, )
कोल्हापुरी (कोल्हापूर),
खानदेशी,
चंदगडी (कर्नाटक, महाराष्ट्र सीमावर्ती प्रदेश), चित्पावनी,
झाडीबोली (भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा भूप्रदेश झाडीपट्टी म्हणून ओळखला जातो. तिथली ही भाषा.)
डांगी, तंजावर,
तावडी (जामनेर, भुसावळ, जळगाव, बांदवर, रावेर, यावल),
देहवाली (भिल्ल समाजात ही बोली आढळते.),
नंदभाषा (व्यापारी भाषा ही सांकेतिक भाषा)
नागपुरी (नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीचा काही भाग, भंडारा, गोंदिया)
बेळगावी (बेळगावची बोलीभाषा, कन्नड, चंदगडी, कोल्हापुरी, कोंकणी यांच्या मिश्रणातून तयार झालेली बोली)
भटक्या विमुक्त
मराठवाडी (महाराष्ट्र-कर्नाटक या सीमावर्ती भागातील उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील बोली)
मालवणी (रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग)
व्हराडी (बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा)