पेटीएम केवायसी करताय, सावधान...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

पेटीएम अद्ययावत करण्यासाठी केवायसीचा बहाणा करुन सायबर गुन्हेगारांकडून नागरीकांना फोन, मेसेज व लिंक पाठवून नागरीकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली जात आहे. पेटीएम केवायसीच्या नावाखाली मागील एक ते दिड महिन्यात तब्बल 158 जणांची 18 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. नागरीकांनी अशा कोणत्याही प्रकारांना बळी पडू नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. 

पुणे : पेटीएम अद्ययावत करण्यासाठी केवायसीचा बहाणा करुन सायबर गुन्हेगारांकडून नागरीकांना फोन, मेसेज व लिंक पाठवून नागरीकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली जात आहे. पेटीएम केवायसीच्या नावाखाली मागील एक ते दिड महिन्यात तब्बल 158 जणांची 18 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. नागरीकांनी अशा कोणत्याही प्रकारांना बळी पडू नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दैनंदिन व्यवहारासाठी नागरीकांकडून पेटीएम व अन्य ईवॉलेटचा सर्रासपणे वापर होऊ लागला आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगारांकडून नागरीकांची फसवणूक करण्यासाठी त्यांना पेटीएम केवायसी करुन घेण्यासाठी फोन केला जातो. तसेच मेसेज किंवा लिंक पाठवून नागरीकांकडून त्यांच्या बॅंक खात्याची गोपनीय माहिती मिळविली जाते. त्यानंतर त्यांच्या बॅंक खात्यातील लाखो रुपये काही मिनीटातच सायबर गुन्हेगार लंपास करीत आहेत. या स्वरुपाच्या 158 घटना शहरात घडल्या आहेत. तर सोमवारी एकाच दिवशी तब्बल 40 तक्रारी दाखल झाल्या होत्या. 

काँग्रेसच्या 'या' दिग्गज नेत्याची होणार चौकशी; चारशे कोटींचे प्रकरण

या प्रकारामुळे सायबर पोलिसांनी नागरीकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. अशा स्वरुपाच्या कोणत्याही फोन, मेसेज किंवा लिंकला प्रतिसाद देऊ नये, तसेच संशय वाटल्यास तत्काळ शिवाजीनगर येथील सायबर पोलिसांकडे संपर्क करण्याचे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी केले आहे. 

नागरीकांना ऐनी डेस्क, टीम व्हीवर, क्वीक सपोर्ट यांसारखे मोबाईल ऍप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले जाते.त्यानंतर त्यांना युपीआय पीनसह एटीएम, क्रेडीट कार्डची गोपनीय माहिती विचारुन त्यांची आर्थिक लुट केली जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Are you doing Paytm KYC careful your bank account may be empty