पुणे - बोपखेलमध्ये लष्करी जवानाची आत्महत्या 

संदीप घिसे 
सोमवार, 14 मे 2018

पिंपरी (पुणे) : राहत्या घरात गळफास घेऊन एका लष्करी जवानाने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता.14) दुपारी पुण्याजवळील बोपखेल परिसरात घडली. 

पिंपरी (पुणे) : राहत्या घरात गळफास घेऊन एका लष्करी जवानाने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता.14) दुपारी पुण्याजवळील बोपखेल परिसरात घडली. 

रामुसिंह शुशपालसिंह राठोड (वय 27, रा. गणेशनगर, बोपखेल) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास त्याने राहत्या घरात ओढणीच्या साहाय्याने छताला लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. तो मूळचा मध्य प्रदेशातील असून सीएमई मध्ये शिपाई म्हणून कामाला होता. मात्र बोपखेलमध्ये स्वतंत्ररीत्या आपल्या पत्नीसह राहत होता. पतीने आत्महत्या केलेली पाहून पत्नीची शुद्ध हरपली असून तिच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. दिघी पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: army man suicide at bopkhel pune