पुण्यातील कोरोना चाचणीच्या दराबाबत मंत्री अमित देशमुख म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 June 2020

कोरोना चाचणी करून करण्यासाठी खासगी प्रयोगशाळेत नागरिकांची लूट सुरू असताना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी याबाबत महत्वाचे आदेश आज विभागीय आयुक्तांना दिले आहेत. 

पुणे ः "कोरोना' चाचणी करून करण्यासाठी खासगी प्रयोगशाळेत नागरिकांची लूट सुरू असताना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी याबाबत महत्वाचे आदेश आज विभागीय आयुक्तांना दिले आहेत. मुंबईच्या धर्तीवर पुण्यात दोन हजार रुपयांमध्ये कोरोनाची चाचणी करण्याची व्यवस्था करा अशा सूचना दिल्याचे देशमुख यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

अबब! शिवाजीनगर स्टेशनच्या रुळावर दिसला अजगर मग...

पुणे महापालिकेकडून स्वस्तामध्ये कोरोनाची चाचणी करणाऱ्या एजन्सींनी परदेशातून आलेल्या नागरिकांकडून तब्बल साडे चार हजार रुपये घेऊन चाचणी केल्याचा प्रकार "सकाळ'ने पुढे आणला होता. यामध्ये पुणे महापालिकेने आम्ही अडीच हजार रुपये दर निश्‍चीत केल्याचे सांगत सारवासारव केली.
दरम्यान, "भारतीय वैद्यक संशोधन संस्थेने (आयसीएमआर) चाचण्यांची संख्या वाढविण्यास सांगितले आहे. त्यानुसार महाराष्ट्रात आत्तापर्यंत सर्वाधिक 5 लाखापर्यंत नगारिकांची तपासणी सुरू केली आहे, असे अमित देशमुख यांनी सांगितले.

न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्यांना अखेर मिळणार दिलासा पण...

त्यावर पुण्यात सुरू असलेल्या लुटमारीबद्दल विचारले असता देशमुख म्हणाले, आपण "आयसीएमआर'च्या निर्देशाप्रमाणे काम करत आहोत, टेस्टींगची संख्या वाढवावी लागणार आहे. मुंबईमध्ये एका चाचणीसाठी दोन हजार रुपये घेतले जात आहेत. त्याच धर्तीवर पुण्यातही दर कमी व्हावेत यासाठी काम केले जात असून, यासाठी विभागीय आयुक्तांना सूचना दिल्या आहेत.''

देशात सर्वाधीक रुग्ण महाराष्ट्रात आढळले असले तरी, महाराष्ट्र सरकारने केलेल्या उपाय योजना समाधानकारक आहेत. डॉक्‍टर, नर्स, सरकारी यंत्रणेने प्रामाणिकपणे काम केले आहे. खासगी व सरकारी रुग्णालय बेड, वॉर्ड, व्हेंटिलेटर, औषधे, पीपीई कीट, मास्कचा पुरेसा साठा आहे. राज्यातील प्रयोगशाळांची संख्या 4 वरून 80 वर गेली आहे. यात आणखी वाढ होईल. सरकार यंत्रणा यंत्रणा उभ्या केल्या करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच पॉजिटीव्ह रुग्णाला बेड, आयसीयू, व्हेंटीलेटर तातडीने उपलब्ध व्हावे, रुग्णाची हेळसांड होऊ नये अशा सुचनाही विभागीय आयुक्तांना दिल्या आहेत. आपला मृत्यूदर कमी झाला आहेत. त्यात आणखी कमी करण्यासाठी उपाय योजना सुरू आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arrange to test a corona in Pune for Rs 2,000 says amit deshmukh