अबब ! शिवाजीनगर स्टेशनच्या रुळावर दिसला अजगर मग... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

python.jpg

पुणे शहरात सहसा अजगर सापडत नाही. सापडलाच तर तो पाळीव असण्याची शक्यता जास्त असते. कदाचित एखाद्या मालगाडी बरोबर अजगर आला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अबब ! शिवाजीनगर स्टेशनच्या रुळावर दिसला अजगर मग...

कोथरुड (पुणे) : काल रात्री दहाच्या सुमारास शिवाजीनगर रेल्वे स्टेशनजवळील रेल्वे रुळावरुन तो चालला होता. रुळाजवळ जाडसर काय हलते आहे हे पाहून त्याचे धाबे दणाणले. रेल्वेरुळच हलतो आहे की आणखी काही या शंकेने त्याने मोबाईलच्या उजेडात पाहिले असता एक मोठा अजगर रुळावरुन शांतपणे जाताना दिसला. पुणे शहरात सहसा अजगर सापडत नाही. सापडलाच तर तो पाळीव असण्याची शक्यता जास्त असते. कदाचित एखाद्या मालगाडी बरोबर अजगर आला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

...म्हणून भक्कम दिसणारी झाडे पावसाळ्यात पडतात उन्मळून

 अजगर दिसला म्हटल्यावर जवळची लोक काय आहे हे पहायला आली. दरम्यान, शिवाजीनगर रेल्वे स्टेशनजवळ अजगर दिसला आहे. असा निरोप सर्पमित्र श्रीकांत पवार यांना आला. पवार यांनी त्यांचे मित्र रोहीत यादव आणि योगेश यादव यांना सोबत घेवून शिवाजीनगर रेल्वे स्टेशन गाठले. घटनास्थळी पोहचून त्यांनी शिताफीने अजगराला आपल्या ताब्यात घेतले. अजगराची पाहणी केली असता तो अजगर सर्वसाधारण माणसापेक्षा फूटभर अधिक उंच वाटत होता.

पुण्यातील काही उद्याने उघडली; पण...

श्रीकांत पवार यांनी वरीष्ठ सर्परक्षक सनी खोमणे यांना याविषयी माहिती दिली. खोमणे यांनी भांबुर्डा वनविभागाचे वरीष्ठ अधिकारी दिपक पवार
यांच्याशी संपर्क साधला. पवार यांनी राजीव गांधी वन्यप्राणी अनाथालयाच्या हवाली करण्यास सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यानुसार, अनिलकुमार खैरे व राजाभाऊ शिर्के
यांच्याकडे हा अजगर सुपूर्त करण्यात आला. दरम्यान, डॉ. सुचित्रा सुर्यवंशी यांनी अजगराची पडताळणी केली असता हा अजगर मादी असुन त्याचे वजन आठ किलो आठशे ग्राम तर लांबी सातफूट आठ इंच म्हणजे
234 सेंमी इतकी भरली.