पुणे जिल्ह्यातील वीजबिलांची थकबाकी चार हजार कोटींच्या पुढे

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 18 October 2020

पुणे जिल्ह्यातील महावितरणच्या सर्व वर्गवारीतील वीजबिलांच्या थकबाकीमध्ये गेल्या मार्च ते सप्टेंबरपर्यंत तब्बल ११३४ कोटींनी वाढ झाली आहे. सद्यस्थितीत घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व कृषिपंपांसह १७ लाख ७७ हजार ग्राहक आहेत. त्यांच्याकडे सुमारे ४ हजार ३२४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीमुळे महावितरणची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे.

पुणे - जिल्ह्यातील महावितरणच्या सर्व वर्गवारीतील वीजबिलांच्या थकबाकीमध्ये गेल्या मार्च ते सप्टेंबरपर्यंत तब्बल ११३४ कोटींनी वाढ झाली आहे. सद्यस्थितीत घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व कृषिपंपांसह १७ लाख ७७ हजार ग्राहक आहेत. त्यांच्याकडे सुमारे ४ हजार ३२४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीमुळे महावितरणची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या संकटापूर्वी मार्चपर्यंत पुणे जिल्ह्यात सर्व वर्गवारीतील १२ लाख २ हजार वीजग्राहकांकडे ३१९० कोटी रुपयांची थकबाकी होती. मात्र गेल्या मार्चपासून कोरोना विषाणूचे संकट सुरु झाल्यानंतर लॉकडाउनच्या काळात व त्यानंतर वीजबिलांचा भरणा कमी झाला आहे. मार्चपासून सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात थकबाकीदार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांच्या संख्येत ५ लाख ७२ हजारांनी वाढ झाली असून थकबाकीची रक्कम देखील तब्बल ६४४ कोटी ३७ लाखांनी वाढली आहे.

झोमॅटोची 'आत्मनिर्भर' डिलिव्हरी गर्ल; नोकरी सोडून सुरू केलं फूड डिलिव्हरीचं काम!

महावितरणचे आवाहन
गंभीर आर्थिक कोंडीच्या परिस्थितीत वीजग्राहकांनी थकबाकी व चालू वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे. वीजग्राहकांना घरबसल्या महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट, मोबाईल ॲप किंवा इतर ‘ऑनलाइन’ पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा करता येईल. यासोबतच ‘लॉकडाऊन’मधील वीजबिलांबाबत शंका असल्यास त्याची घरबसल्या पडताळणी किंवा तपशील हा https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवर उपलब्ध आहे, असेही महावितरणने कळविले आहे.

NEET Result 2020: 'नीट'मध्ये महाराष्ट्राचा नंबर खालून दुसरा; काय आहेत कारणे?

जिल्ह्यातील ग्राहक व थकबाकी
१४ लाख ७१,७०० घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहक 
९३० कोटी थकबाकी
३,५,९०० कृषिपंप व इतर ग्राहक
३३९३ कोटी ९३ लाख थकबाकी
१७,७७,५०० एकूण ग्राहक
४३२४ कोटी रुपये थकबाकी

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arrears of electricity bills in Pune district exceed Rs 4000 crore