esakal | पुणे महापालिकेने ‘अभय’ दिल्यानंतरही थकबाकी
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Municipal

पुणे महापालिकेने ‘अभय’ दिल्यानंतरही थकबाकी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - महापालिकेचे उत्पन्न (Municipal Income) वाढविण्यासाठी गेल्यावर्षी मिळकतकर (Property Tax) विभागाने अभय योजना राबविली होती. त्यामध्ये वर्षानुवर्षे थकबाकी (Arrears) असलेल्या नागरिकांनी कर भरला. यंदाही ते नियमीत कर भरतील, अशी प्रशासनाला (Administrative) अपेक्षा होती. मात्र, गेल्या एप्रिल ते जूनपर्यंत १० टक्के सवलत देऊनही १ लाख ४९ हजारांपैकी ५६ हजार जणांनी १२७ कोटी रुपंयाचा मिळकतकर भरला. मात्र, ९२ हजार नागरिकांनी कर भरण्याकडे पाठ फिरवली आहे. (Arrears even After Pune Municipal Corporation Granted Sanctuary)

मिळकतकराची थकबाकी वसूल करण्याचे आव्हान प्रशासनापुढे निर्माण झाले आहे. महापालिकेच्या उत्पन्नामध्ये मिळकतकर विभागाचा मोठा वाटा आहे. शहरात लाखो इमारती असल्या, तरी त्यातील अनेक जण मिळकतकर भरत नाहीत. त्यामुळे थकबाकीची रक्कम वाढत जाते. थकबाकी वेळेत भरली नाही, तर त्यावर दंड लावला जातो, त्यामुळे ही रक्कम वाढते. या मिळकतधारकांवरील थकबाकीदार असा शिक्का पुसून टाकण्यासाठी गेल्यावर्षी १५ ऑक्टोबर ते ३१ जानेवारी या कालावधीत अभय योजना राबविण्यात आली. त्यामध्ये दंडाच्या रक्कमेत ७० ते ७५ टक्के सूट दिली होती. या कालावधीत १ लाख ४९ हजार ६८३ जणांनी ४८५ कोटी ६८ लाख रुपयांचा मिळकतकर भरला होता.

हेही वाचा: खडकवासला धरण साखळीत सुमारे २९.७३ टक्के पाणीसाठा

महापालिकेतर्फे दरवर्षी १ एप्रिल ते ३१ मे या दोन महिन्याच्या काळात मिळकतकर भरणाऱ्यांना ५ ते १० टक्क्यांची सूट देण्यात येते. यंदाही ही सूट दिली होती. परंतु, कोरोना व लॉकडाउनमुळे आर्थिक अडचण असल्याने अनेक नागरिकांना या काळात मिळकतकर भरता आलेला नव्हता. त्यामुळे ३० जूनपर्यंत मुदत वाढविण्यात आली होती. या तीन महिन्यात ५ लाख ९५ हजार ९४५ मिळकतधारकांडून महापालिकेकडे एकूण ९१४ कोटी २७ लाख रुपयांचा कर तिजोरीत जमा झाला आहे. मात्र, ९२ हजार नागरिकांनी कर न भरल्याने प्रशासनाच्या अपेक्षेपेक्षा कमी पैसे जमा झाले आहेत.

यंदा १ एप्रिल ते ३० या तीन महिन्यांत अभय योजनेचा लाभ घेणाऱ्या १ लाख ४९ हजार ६८३ जणांनी कर भरणे अपेक्षीत होते. परंतु, ५६ हजार ८८३ नागरिकांनी कर भरला असून, त्यामधून १२७ कोटी ६८ लाख रुपयांचा उत्पन्न मिळाले आहे. ९२ हजार ८०० जणांचा कर भरला गेला नसल्याने ३५८ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

  • गेल्या वर्षी योजनेचे लाभार्थी - १,४९,६८४

  • यंदा कर भरलेले नागरिक - ५६,८८३

  • कर न भरलेले नागरिक - ९२,८००

  • जमा झालेली रक्कम - ४८५.६८ कोटी

  • जमा झालेली रक्कम - १२७.६८ कोटी

  • थकबाकी - ३५८ कोटी

गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत सवलत असताना अभय योजनेचा लाभ घेतलेल्या नागरिकांनी मिळकतकर भरणे अपेक्षीत होते. पण ९२ हजार नागरिकांनी कर भरला नाही. परंतु, भविष्यात त्यांना कर भरावा लागेल. त्यासाठी प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू आहे.

- विलास कानडे, प्रमुख, मिळकतकर विभाग

loading image