अमेरीकन डॉलरच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या टोळीस अटक

3arrested_54.jpg
3arrested_54.jpg

पुणे : अमेरीकन डॉलर देण्याचा बहाणा करुन एका नागरिकास दिड लाख रूपयांचा गंडा घालणाऱ्या पश्चिम बंगालमधील टोळीस फरासखाना पोलिसांनी बेडया ठोकल्या. संबंधित आरोपींनी पुण्यासह वेगवेगळ्या राज्यामध्ये या स्वरुपाचे प्रकार केले असण्याची शक्यता आहे.

बबलू हरेश शेख, सेतु आबू मतुबुर, सिंतु मुतलिक शेख, रिदोइ महमद रहीम खान असे अटक केलेल्या संशयीत आरोपीची नावे आहेत. याप्रकरणी आंबेगाव खुर्दजवळील दत्तनगर परिसरात राहणाऱ्या 39 वर्षीय व्यक्तीने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरुन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा परकीय चलनाच्या बदल्यात भारतीय चलन देण्याचा व्यवसाय आहे. त्यानुसार मंगळवारी सकाळी अकरा वाजता दोन अनोळखी व्यक्ती त्यांना बुधवार पेठेतील एका दुकानामध्ये भेटल्या. त्यावेळी त्यांनी आमच्याकडे अमेरीकन डॉलरच्या पाचशे नोटा असल्याचे फिर्यादी यांना बतावणी केली. त्यानंतर फिर्यादी यांना अमेरीकन डॉलरच्या पाचशे नोटा देऊन त्यांच्याकडून दिड लाख रुपयांची रक्कम घेतली.

आरोपी गेल्यानंतर फिर्यादी यांनी अमेरीकन डॉलर तपासून पाहीले. त्यावेळी अमेरीकन डॉलरची एक नोट व त्याखाली वृत्तपाच्या कागदाची गुंडळी देऊन फिर्यादीची फसवणूक केली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली होती. त्यानंतर फरासखाना पोलिसांनी आरोपीना अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com