बारामती : सराईत गुन्हेगारास अटक

baramati
baramati

बारामती : येथील गुन्हे शोध पथकाने नगर व पुणे जिल्ह्यात जबरी चोरी व चोरी करताना लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास नुकतीच शिताफीने अटक केली. प्रकाश अजिनाथ गायकवाड (वय 45, रा. बेनवडी, ता. कर्जत, जि. नगर) असे अटक केलेल्याचे नाव असून त्याच्यावर कर्जत, हडपसर, बारामती, फलटण, इंदापूर, जामखेड, भूम, परांडा, माढा, कोतवाली पोलिस ठाणे नगर, पुणे या सारख्या ठिकाणी मोटारसायकल चोरीचे तब्बल 55 गुन्हे प्रकाश गायकवाड याच्याविरुध्द दाखल आहेत. नगर व बारामतीतील सहा गुन्ह्यांसह त्याच्या नावावर आता 61 गुन्हे झाले आहेत. 

पोलिस असल्याची बतावणी करुन, मोटारसायकलला पोलिसांची काठी लावून व पोलिसांसारखे बूट वापरुन महिलांना गाठून त्यांचा ऐवज चोरुन नेण्याची त्याची कार्यपद्धती होती. 

बारामती व तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन गुन्हे घडल्यावर अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी सहायक पोलिस निरिक्षक चंद्रशेखर यादव व त्यांच्या पथकाला तपासाचे निर्देश दिले. पोलिस कर्मचारी संदीप जाधव, स्वप्नील अहिवळे, रॉकी देवकाते, दशरथ कोळेकर, शर्मा पवार, विशाल जावळे यांनी बारकाईने तपास करत, सीसीटीव्ही फूटेज तपासून गोपनीय माहितीच्या आधारे कोणताही धागा दोरा हातात नसताना प्रकाश गायकवाड याला शोधून काढून त्याला गजाआड केले. त्याच्याकडे सखोल तपास सुरु असून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता चंद्रशेखर यादव यांनी बोलून दाखविली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com