पुणे : एसबीआय बँकेचे एटीएम मशीन उचटकणाऱ्यास अटक 

ATM-Theft.jpg
ATM-Theft.jpg

पुणे : सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रामध्ये जाऊन एटीएम मशीन उघडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास डेक्कन पोलिसांनी अटक केली. ही घटना सोमवारी पहाटे तीन वाजता कर्वे रस्त्यावरील अभिनव विद्यालयाजवळील एटीएम केंद्रामध्ये घडली. 

सतीश बाबूलाल धोत्रे (वय 41 , रा. कर्वे रस्ता) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी विनोद कांबळे यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे डेक्कन पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ते आपल्या सहकाऱ्यासह डेक्कन परिसरामध्ये गस्त घालत होते. त्यावेळी अभिनव विद्यालयाजवळ असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रामध्ये एकजण संशयास्पद हालचाली करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तेथे जाऊन पाहणी केली. त्यावेळी आरोपी हा चोरीच्या उद्देशाने एटीएम मशीनचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com