पुण्यात बेकायदा पिस्तुल बाळगणाऱ्यास अटक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

बेकायदा पिस्तुल  बाळगणाऱ्यास गुन्हे शाखेच्या यूनिट एकच्या पथकाने अटक केली. आरोपीकडून एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे असा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

पुणे : बेकायदा पिस्तुल  बाळगणाऱ्यास गुन्हे शाखेच्या यूनिट एकच्या पथकाने अटक केली. आरोपीकडून एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे असा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

 सुजित मीनानाथ देवकुळे (वय 32 वर्ष, रा.विघ्नहर्ता नगर, बिबवेवाडी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या यूनिट एकचे पथक गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत होते. त्यावेळी एक तरुण बिबवेवाडीमध्ये बेकायदा शस्त्र बाळगुन फिरत असल्याची खबर पोलिस कर्मचारी अमोल पवार यांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरिक्षक अरुण वायकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तरुणास ताब्यात घेतले. त्याची चौकशी व तपासणी केल्यानंतर त्याच्याकडे एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्तुल, दोन जीवंत काडतुसे, रेम्बो चाकू असा 40 हजार रूपयांचा ऐवज सापडला. पोलिसांनी त्यास अटक करून बिबवेवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arrested for possessing illegal pistol