रिक्षाचालकासोबत भांडण करणाऱ्या महिलेस अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मे 2019

पुणे : पुण्यात एका महिलेने रिक्षाचालकाबरोबर भांडण केले. रिक्षाचालक तिच्याविरुध्द तक्रार देत असतानाच तिने महिला पोलिस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.​

पुणे : पुण्यात एका महिलेने रिक्षा चालकाबरोबर भांडण केले. सदर रिक्षाचालक तिच्याविरुध्द तक्रार देत असतानाच तिने महिला पोलिस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना सकाळी साडे दहा वाजता फुरसुंगी येथे घडला. याप्रकरणी स्वप्नाली शिंदे ( वय 27, रा. भेकराईनगर) या महिलेस अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी महिला पोलिस कर्मचारी सारिका घोडके यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक के.एस.लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक विठ्ठल शिंदे यांच्या रिक्षातून स्वप्नाली शिंदे प्रवास करत होते. त्यावेळी रिक्षाचालक व महिलेचे वाद झाले. त्यावरून रिक्षाचालक फुरसुंगी पोलिस चौकीत तक्रार देण्यासाठी गेले.

घोडके रिक्षाचालकाची फिर्याद घेत होत्या. त्यावेळी महिलेने फिर्यादीस अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत त्यांना धक्काबुक्की केली. तसेच त्यांच्यासमोरील कॉम्प्युटर, किबोर्ड फोडण्याचा प्रयत्न केला. त्यावरुन महिलेविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arrested woman who quarrel with auto driver