महिन्याला 50 हजारांचा हप्ता मागणारा गजाआड 

महिन्याला 50 हजारांचा हप्ता मागणारा गजाआड 

पुणे - सराईत गुन्हेगाराचे नाव सांगून हॉटेल व्यवस्थापकाकडे महिन्याला पन्नास हजार रुपयांची हप्ता मागणाऱ्यास खंडणीविरोधी पथकाने जेरबंद केले. त्याने यापूर्वीही हॉटेल व्यवस्थाकाकडून खंडणी उकळल्याचे चौकशीत पुढे आले आहे. त्यास न्यायालयाने 31 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

चार्लस्‌ ऊर्फ देवराज जेम्स थापा (वय 27, रा. मुंढवा) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी प्रकाश जयशंकर शुक्‍ला (वय 28, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी हे बंडगार्डन परिसरातील एका हॉटेलमध्ये व्यवस्थापक आहेत. मागील आठवड्यात त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीने फोन करून "प्रोटेक्‍शन मनी' म्हणून दरमहा पन्नास हजार रुपयांचा हप्ता मागितला. न दिल्यास हॉटेलमध्ये येऊन गोळ्या घालण्याची धमकी एका सराईत गुन्हेगाराचे नाव सांगत दिली. याप्रकरणी शुक्‍ला यांनी पोलिसांना खबर दिली. त्यावरून गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने शुक्‍ला यांना आलेल्या मोबाईल क्रमांकावरून थापाचा शोध घेऊन त्यास अटक केली. 

थापा हा मूळचा आसामचा आहे. बाणेर येथील एका हॉटेलमध्ये तो काही वर्षांपासून काम करत आहे. त्याने जस्ट डायलवरून शुक्‍ला यांचा मोबाईल क्रमांक मिळवून त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली. दरम्यान, याच पद्धतीने त्याने शिवाजीनगर येथील हॉटेल व्यावसायिकासही एक कोटी रुपयाची खंडणी मागितल्यामुळे त्यास अटक करण्यात आली होती. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com