उजनीच्या बॅकवाॅटरवर परदेशी पक्षांचे आगमन

जलाशयावर सर्वांत लक्षवेधी ठरणाऱ्या रोहित (प्लेमिंगो) पक्षांचे आगमण झाले
प्लेमिंगो पक्षांचे आगमण झाले
प्लेमिंगो पक्षांचे आगमण झालेsakal

कळस : उजनी धरणाचा बॅकवाॅटर परिसर विविध परदेशी पक्षांच्या आगमनाने फुलून गेला आहे. जलाशयावर सर्वांत लक्षवेधी ठरणाऱ्या रोहित (प्लेमिंगो) पक्षांचे आगमण झाले आहे. सायबेरिया येथून हजारो किलोमिटरचा प्रवास करुन दरवर्षी हे पक्षी भारतात दाखल होतात. गुजरातमधील कच्छमध्ये हे पक्षी विणीचा हंगाम उरकतात. तर उजनीच्या बॅकवाॅटर परिसरात खाद्य मिळविण्यासाठी सुमारे पाच महिन्यांच्या मुक्कामासाठी या पक्षांचे येथे आगमण होते. उजनीलगतच्या कुंभारगाव, पळसदेव व चिंचोली या भागात हे पक्षी आढळून येत आहेत. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वाधिक पक्षांचे आगमण झाले असल्याचे स्थानिक पक्षीनिरिक्षक सांगत आहेत. रोहित पक्षांबरोबर पट्टकादंब, कुदळ्या, कैकर, गोगलफोड्या, भोरड्या, ब्राम्हणी बदक, किरकिरा, राखी बगळा, चित्रबलाक, ससाणा, हळदी-कुंकू बदक, तलवार बदक, थापट्या, स्पूनबील, पाणकावळे, नंदीमूख, वकील यांसारखे अन्य शेकडो प्रजातींचे पक्षी हजारोंच्या संख्यने या जलाशयावर दाखल झाले आहेत. यामुळे पर्यटक व पक्षी अभ्यासकांची पक्षी निरिक्षणासाठी गर्दी होवू लागली आहे.

उजनी बॅकवाॅटरच्या उथळ पाण्यात तीनशे ते चारशेच्या संख्येने रोहित पक्षांचे थवे आढळून येत आहेत. पाण्यातील शेवाळ (अलगी) पायाने उखडल्यानंतर ते पाण्यावर तंरगण्यास सुरवात झाल्यावर चोचीने खाण्याचा त्यांचा दिनक्रम आहे. याशिवाय पाण्यातील लहान झिंगे ते टपकण गिळंकृत करतात. एका रांगेत उभे राहण्याची व कवायत करण्याची त्यांची पद्धत मनमोहक दिसते. येथील दिर्घ मुक्कामानंतर शरीरात उर्जा साठवून पावसाळ्यात येथून आपला मुक्काम हलवितात.

प्लेमिंगो पक्षांचे आगमण झाले
कर्तव्य बजावतांना वन कर्मचारी शहीद | Ahmednagar

याशिवाय कोलंबिया येथून पट्टकादंब हा पक्षीही उजनीवर दाखल झाला आहे. सध्या चारशे ते पाचशेच्या संख्येने हे पक्षी आढळून येत आहेत. उजनीलगतचे कोवळे गवत हे या पक्षांचे प्रमुख खाद्य आहे. उत्तर अमेरिकेतून कैकर हा पक्षीही येथे आल्याचे दिसून येत आहे. त्यांची संख्या ५ ते १० च्या आसपास आहे. पाण्यातील झाडे, विद्युत खांबावर बसून पाण्यातील माशांवर झडप मारुन ते आपले खाद्य मिळवितात. युरोपातील गोगलफोड्या हा पक्षी येथे आढळून येत आहे. येथील गोगलगाईंना चोचीने फोडून तो आपले खाद्य बनवतो. या पक्षाची चोच आडकीत्यासारखी असते. म्हणून याला आडकीता नावानेही ओळखले जाते. याशिवाय उजनीलगतचे आकर्षण असलेला ब्राम्हणी बदक (चक्रवाक) जोडीने आढळून येत आहेत. सोनेरी रंगाची ही पक्षांची जोडी पर्यटकांना भूरळ घालते. सायंकाळच्या वेळी उजनीवर फेरफटका मारल्यानंतर भोरड्यांची कवायत मनमोहक दिसते. पाण्यालगतच्या काटेरी झुडपांवर भोरड्या मुक्कामी असतात.

कुंभारगाव येथील पक्षी निरिक्षक दत्ता नगरे व संतोष पानसरे म्हणाले, सध्या उजनीचा बॅकवाॅटर परिसर विविध परदेशी पक्षांच्या आगमनाने फुलून गेला आहे. यामुळे पर्यटक व पक्षी निरिक्षकांची पावले उजनीलगत वळू लागली आहेत. उजनीतून मिळणारे मुबलक खाद्य व सुरक्षितता या पक्षांना येथे दरवर्षी आकर्षित करते. पक्षांच्या आगमनानंतर येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी कुंभारगावमध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अंतर्गत निवास व न्याहरीची अधिकृतरित्या सोय करण्यात आली आहे. या शिवाय पर्यटकांना पक्षी निरिक्षणासाठी सुरक्षा जॅकेटसह ८ ते १० बोटींची सोय आहे. यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com