esakal | Video : आली माहेरवाशीण सोन्याच्या पावलांनी...
sakal

बोलून बातमी शोधा

gauri.jpg

"आली, आली गौराई, सोन्या रुप्याच्या पावलानं...आली आली गौराई धनधान्याच्या पावलानं... या स्वागत गीतासह पारंपरिक पद्धतीने बाणेर, बालेवाडी परिसरात गौरीचे आगमन झाले. 

Video : आली माहेरवाशीण सोन्याच्या पावलांनी...

sakal_logo
By
शीतल बर्गे

बालेवाडी (पुणे) :"आली, आली गौराई, सोन्या रुप्याच्या पावलानं...या स्वागत गीतासह पारंपरिक पद्धतीने बाणेर, बालेवाडी परिसरात गौरीचे आगमन झाले. भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गणपतीपाठोपाठ येणारे महत्त्वाचे व्रत म्हणजे गौरीपूजन. यावर्षी कोरोनाचे सावट असले तरी घराघरांतून मोठ्या भक्तिभावाने मंगलमय वातावरणात महिलांनी गौराईंचे स्वागत केले. 

पुण्यात फिल्मीस्टाईल थरार; खूनाचा प्रयत्न करणाऱ्याचा पोलिसांनी केला पाठलाग आणि...

नोकरी करणाऱ्या सुवासिनींना एरवीही गौरींची सजावट किंवा वेगवेगळे पदार्थ करण्यासाठी सवड मिळत नाही, मात्र कोविडच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी घरून काम करण्यास सांगितले असल्याने नोकरदार महिलांनाही यंदा काही प्रमाणात सजावट व पदार्थ बनविण्याची हौस करता आली, तर दुसरीकडे कोविडमुळे मोलकरणींना सुटी दिलेली असल्याने काही महिलांना मात्र कार्यालयीन कामासोबतच घरकाम करताना कसरत करावी लागत असल्यामुळे साधेपणाने गौरी-गणपतीचा उत्सव साजरा करावा लागत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भाद्रपद महिन्यामध्ये शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर महालक्ष्मी किंवा गौरीच्या प्रतिमा व प्रतिके बसवली जातात. काही घरांत उभ्या गौरी असतात, तर काही घरांमध्ये गौरी पाटावर बसविल्या जातात. गौरी बसविण्याच्या वेळी गौरींचे मुखवटे एका ताटामध्ये ठेवून तुळशीजवळ त्या मुखवट्यांची पूजा केली जाते व त्यानंतर घंटानाद करीत गौरी स्थानापन्न होतात. गौरींना दूर्वा, आघाडा, फुले, हळदी-कुंकू वाहिले जाते. गौरींची खणा-नारळाने ओटी भरली जाते. गौरींचे बाळ म्हणून काही घरातून बाळकृष्ण पूजन केले जाते. शेतकरी कुटुंबामध्ये गौरीसमोर धान्याच्या राशी ठेवल्या जातात. त्याचबरोबर वेगवेगळे फराळाचे पदार्थ, फळेही ठेवतात. गौरी या माहेरवाशिणी आहेत, असे मानून त्यांचे अत्यंत आपुलकीने स्वागत केले जाते. सायंकाळी त्यांना भाजी-भाकरीचा नैवेद्य असणार आहे, या कामाची लगबगही सुरू झाली आहे. 

loading image
go to top