गावरान रायवळची आवक सुरू

कोकणातील हापूस आंब्याची आवक कमी झाल्यानंतर आता मार्केट यार्डात गावरान आब्यांची आवक सुरू झाली आहे
arrival of Gavaran mango After arrival of Hapus Mango in Konkan decreased pune market yard
arrival of Gavaran mango After arrival of Hapus Mango in Konkan decreased pune market yardsakal

पुणे : कोकणातील हापूस आंब्याची आवक कमी झाल्यानंतर आता मार्केट यार्डात गावरान आब्यांची आवक सुरू झाली आहे. रविवारी (ता. २९) फळ विभागात गावरान रायवळ आंब्याची आवक झाली. दरवर्षी पुणेकर गोड, नैसर्गिकरित्या पिकलेल्या आणि रसाळ गावरान आंब्याची आवर्जून वाट पाहत असतात. यंदा हवामान बदलामुळे उशिरा पाड आल्यामुळे गावरान हापूस आणि पायरीची आवक अद्याप झालेली नाही. पुढील पाच ते सात दिवसात या आंब्याचीदेखील चव चाखण्यास मिळणार असल्याचे गावरान हापूसचे व्यापारी यशवंत कोंडे यांनी सांगितले. गेल्या वर्षी १५ मे रोजीच गावरान हापूसची आवक झाली होती. मात्र, यंदा विलंबाने होणार आहे. रविवारी २० ट्रे रायवळ आंब्याची आवक झाली असून, एका ट्रेमध्ये साधरणपणे आठ ते दहा डझन आंबे असतात. या आंब्यांची १०० ते १२० रुपये किलो भावाने विक्री झाली. मुळशी तालुक्‍यातील गुजरवाडी भागातून ही आवक झाली.

रत्नागिरी, कर्नाटक हापूसची आवक घटली

मार्केट यार्डात रत्नागिरी आणि कर्नाटक हापूसची आवक घटत चालली आहे. रविवारी ७०० ते ८०० पेटी रत्नागिरी हापूसची आवक झाली. चार ते सात डझनाच्या तयार पेटीस १५०० ते २००० रुपये भाव मिळाल्याचे व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले. तर, कर्नाटक हापूसच्या चार ते पाच डझनाच्या पेटीस ८०० ते १५०० रुपये भाव मिळत आहे. मागील आठवड्यात कर्नाटक येथे पाऊस झाल्याने आवक घटली आहे. त्यातही चांगल्या प्रतीच्या मालाचे प्रमाण कमी असल्याचे कर्नाटक हापूसचे व्यापारी रोहन उरसळ यांनी सांगितले.

गेल्या वर्षी रायवळ आंब्याला सुरुवातीला डझनास ५० ते ६० रुपये भाव मिळाला होता. मात्र, यावर्षी हवामान बदलामुळे विलंबाने आवक झाली आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट भाव मिळाला आहे. लवकरच गावरान हापूस आणि पायरी बाजारात दाखल होईल.

- यशवंत कोंडे, गावरान हापूसचे मार्केट यार्डातील व्यापारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com