भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्टस्‌मध्ये कला प्रदर्शन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

पुणे : धनकवडी येथील भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाइन आर्टसतर्फे दरवर्षी कला प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. या वर्षी हे प्रदर्शन 18-22 जानेवारीपर्यंत होणार आहे. या प्रदर्शनात दरवर्षी पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांच्या दोन हजार कलाकृती सादर केल्या जातात. यामध्ये चित्रकला, शिल्पकला, मांडणीकला (इंस्टॉलेशन) अशा विविध प्रकारच्या कलाप्रकारांचा समावेश आहे. या वर्षीच्या प्रदर्शनामध्ये डिजिटल इंडिया, स्वच्छता अभियान, ब्लॅक होल यांसारख्या काही सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या नावीन्यपूर्ण कलाकृतीही रसिकांना पाहायला मिळतील. 

यावर्षीच्या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे पद्मश्री लक्ष्मा गौड यांच्या काही अप्रतिम कलाकृती पाहण्याची सुवर्णसंधी रसिकांना मिळणार आहे. पद्मश्री लक्ष्मा गौड यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्रेदेखील या प्रदर्शनात ठेवली जाणार आहेत. 

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्टस्‌ या महाविद्यालयाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय निसर्गचित्रण स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांची तसेच काही सहभागींची देखणी चित्रे यामध्ये प्रदर्शित होणार आहेत. 

या प्रदर्शनाचे उद्घाटन भारती विद्यापीठ शालेय शिक्षण समिती अध्यक्षा विजयमाला कदम यांच्या हस्ते 17 जानेवारी 2017 संध्याकाळी चार वाजता होणार आहे. या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ऑरा आर्ट गॅलरीचे संचालक हरमित सिंह सेठी उपस्थित राहणार आहेत. 
हे प्रदर्शन 18 जानेवारीपासून 22 जानेवारी पर्यंत सकाळी 9 ते 5 या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले असून सर्व कलारसिकांनी या प्रदर्शनाचा आस्वाद घ्यावा असे आयोजकांनी आवाहन केले आहे. 

Web Title: Art exhibition in bharti university