Video : वन्यजीवांचा बचाव अन् पुनर्वसनाचं कार्य

नीला शर्मा
Wednesday, 17 June 2020

वन्यजीवांचा बचाव आणि पुनर्वसनकार्यात सिद्धार्थ एडके हा तरुण ११ वर्षांपासून रमला आहे. अस्वल नाचवणारे कलंदर, हत्ती घेऊन फिरणारी माणसं आणि गारुड्यांच्या तावडीतील साप यांसारख्या अनेक वन्यजीवांना सोडवण्याचं लाखमोलाचं समाधान तो अनुभवतो आहे. 

वन्यजीवांचा बचाव आणि पुनर्वसनकार्यात सिद्धार्थ एडके हा तरुण ११ वर्षांपासून रमला आहे. अस्वल नाचवणारे कलंदर, हत्ती घेऊन फिरणारी माणसं आणि गारुड्यांच्या तावडीतील साप यांसारख्या अनेक वन्यजीवांना सोडवण्याचं लाखमोलाचं समाधान तो अनुभवतो आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अस्वल, साप, हत्ती यांसारख्या वन्यजीवांना पैशांसाठी राबवणाऱ्यांकडून सोडवून त्यांचं पुनर्वसन करण्याचं काम सिद्धार्थ एडके मनोभावे करतो. तो म्हणाला, ‘‘राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन अधिनियमानुसार वन्य प्राणी बाळगणं हा गुन्हा आहे. मात्र अस्वलाच्या नाकात दोरी घालून, त्याला पैशांसाठी नाचवणारे काही ठिकाणी दिसतात. हत्ती घेऊन फिरणारी मंडळी त्याच्या माध्यमातून पैसे मिळवतात.

नाग किंवा सापांचा खेळ दाखवणारे गारुडी काहींनी पाहिले असतील. अशांच्या तावडीतून वन्यजीवांना सोडवणं आणि त्यांचं पुनर्वसन करणं हे माझं काम आहे. याचबरोबर जखमी अवस्थेत आढळलेले पक्षी, प्राणी तसंच एकटी सापडलेली पिलं यांची काळजी घेणं, त्यांच्या खाण्यापिण्याची व औषधोपचारांची व्यवस्था बघणं हे माझ्या कामाचं स्वरूप आहे. काश्‍मीरमधील काळ्या अस्वलापासून ते आग्रा येथील हत्तींच्या पुनर्वसन केंद्रापर्यंत विविध ठिकाणचा अनुभव गाठीशी आहे.’’

सिद्धार्थ याने असंही सांगितलं की, पूर्वी मी ‘वाइल्ड लाइफ एसओएस’ या स्वयंसेवी संस्थेच्या विविध राज्यांतील शाखांमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करायचो. आता दिल्लीतील टेरी (द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट) या संस्थेतर्फे ‘वन्यजीव संरक्षण व जनजातींच्या उपजीविकेसाठी पर्यावरणीय पर्यटन’ या संदर्भातील प्रकल्पांतर्गत काम करतो. गोंड, बैगा अशा जमातींमधील लोक साप चावला, तर अंधश्रद्धेपायी मंत्रतंत्राचा मार्ग अवलंबतात. त्यांच्यात याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. बिबटे तसंच हिमअस्वलं यांच्यासंबंधी पुनर्वसन कार्य करताना हे जीव आणि माणसं यांच्यातील संघर्षाचे प्रसंग बघायला मिळतात. ते टाळण्यासाठी व स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आमच्या संस्थेतर्फे प्रयत्न केले जात आहेत. यासाठी कार्यरत टीममध्ये मी माझी जबाबदारी पार पाडतो आहे. या कामांमुळे निसर्गाच्या सहवासात राहून त्याची सेवा करण्याची संधी मला मिळाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article nila sharma on animal bird lifesaver siddharth edake