Video : पारंपरिक चित्रशैलींचा वेधक मागोवा

नीला शर्मा
बुधवार, 8 जुलै 2020

पारंपरिक भारतीय चित्रशैलींचा त्यांनी अभ्यास केला. अजिंठा चित्रशैली व अमरावती येथील शिल्पशैली या दोन्हींवर पीएच.डी. केली. राजस्थान, माळवी व मुघल चित्रशैलींचा मराठा चित्रशैलीवर कसा प्रभाव दिसतो, याचा शोध घेतला. परंपरागत शैलींची अनुभूती घेत डॉ. श्रीकांत प्रधान यांनी स्वतःची अनोखी शैली साकारली.

पारंपरिक भारतीय चित्रशैलींचा त्यांनी अभ्यास केला. अजिंठा चित्रशैली व अमरावती येथील शिल्पशैली या दोन्हींवर पीएच. डी. केली. राजस्थान, माळवी व मुघल चित्रशैलींचा मराठा चित्रशैलीवर कसा प्रभाव दिसतो, याचा शोध घेतला. परंपरागत शैलींची अनुभूती घेत डॉ. श्रीकांत प्रधान यांनी स्वतःची अनोखी शैली साकारली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डॉ. प्रधान  म्हणाले, ‘‘मी जी माझी स्वतःची लघुचित्र चित्रशैली विकसित केली आहे, त्यामागे पारंपरिक भारतीय चित्रशैलींच्या अभ्यासातून मला गवसलेलं सौंदर्यशास्त्रीय विचारधन आहे. इतिहास, पुरातत्त्व आणि चित्रकलेचा मी अभ्यासक. कलेच्या इतिहासाची जागतिक पातळीवरील माहिती मिळवण्यासाठी पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळातील म. श्री. माटे यांचे मार्गदर्शन दीपस्तंभाप्रमाणे लाभलं. भारतीय चित्रशैली कशी विकसित होत गेली, याचा मागोवा घेतला. त्यासाठी राजस्थान, कर्नाटक, पहाडी व कांग्रा आदी शैलींचा सखोल अभ्यास केला. जे. डी. आर्टची पदवी होती. जोडीला प्राच्यविद्या या विषयाचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं. यात पुढे एम.फिल. केलं. यातून संशोधनाच्या रीती कळत गेल्या. अजिंठा आणि अमरावती येथील शिल्पांवर पीएच.डी. केलं. मराठा चित्रशैलीचा धांडोळा घेतला. या सगळ्याच्या वैचारिक मंथनातून माझी स्वतःची शैली तयार झाली आहे.’’

प्रधान यांनी असंही सांगितलं की, माझ्या चित्रकृतींसाठी योग्य हातकागद निवडणं, त्यावर प्रक्रिया करणं, रंगलेपनासाठी कुंचले स्वतः तयार करणं हे मी करतो. माती, शेंदूर, सोनं आणि मौल्यवान खड्यांपासून नैसर्गिक रंग तयार करतो. प्रत्येक रंगाचा एक स्वभाव असतो. त्याच्या रंगछटांमधून निरनिराळ्या भावना प्रकटतात. रंगांचं परस्परांशी साहचर्य असतं. ही गोष्ट लक्षात घेतली नाही, तर रंग नुसते फासले जातात. मी पुराण व जातक कथांमधील प्रतीकं आणि रंगांची बोली यांतून विशिष्ट आशय सांगण्याचा प्रयत्न करतो. पाहणाऱ्यांना चित्रांमधून आनंद मिळाला पाहिजे. तो दैवी पातळीवरचा असावा, या हेतूने प्रेरित होऊन मी हे सारं करतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Nila Sharma on dr shrikant pradhan