Video : निवृत्तीनंतर विविध छंदांमधून फुलविला आनंद

नीला शर्मा
Sunday, 7 June 2020

जयंत देवधर यांनी निवृत्तीनंतरच्या काळात नवनवीन छंद जोपासण्यावर भर दिला आहे. योगासनं, सायकल सफारी, टेकडीवरील वृक्षांची निगा राखणं यासारखे व्यक्तिगत व सामाजिक पातळीवरचे छंद समजून-उमजून जोपासण्याचे त्यांचे प्रयत्न निश्‍चितच अनुकरणीय आहेत.

जयंत देवधर यांनी निवृत्तीनंतरच्या काळात नवनवीन छंद जोपासण्यावर भर दिला आहे. योगासनं, सायकल सफारी, टेकडीवरील वृक्षांची निगा राखणं यासारखे व्यक्तिगत व सामाजिक पातळीवरचे छंद समजून-उमजून जोपासण्याचे त्यांचे प्रयत्न निश्‍चितच अनुकरणीय आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

निवृत्तीनंतर काय करावं हे अनेकांना सुचेनासं होतं. इतक्‍या वर्षांची धावपळीची दिनचर्या अचानक थांबते. माणसं भांबवतात. मात्र जयंत देवधर यांच्यासारखे काहीजण विचारपूर्वक वेगवेगळे छंद जोपासत दैनंदिन जीवन कसं गतिमान ठेवतात, ते लक्षात घेण्यासारखं आहे. देवधर म्हणाले, ‘‘नोकरीत असताना छंद जोपासण्यासाठी फारसा वेळ मिळाला नाही.

निवृत्ती जवळ आली असताना मी मनाशी ठरवलं की, आपण यानंतरच्या काळात निरनिराळे छंद जोपासायचे. यात व्यक्तिगत व सामाजिक पातळीवरचे, असं संतुलन ठेवायचाही मी विचार केला. व्यक्तिगत छंदांमधून मला मनसोक्त चित्रं काढणं, संगीत ऐकणं यांसारख्या गोष्टी अपेक्षित होत्या. सामाजिक छंद म्हणजे मी टेकडीवरील झाडांना पाणी देणं, पाचोळ्यापासून तयार झालेलं सेंद्रिय खत झाडांना पुरवणं आदी. यातून मला आनंद मिळण्याबरोबरच टेकडी हिरवी राहाणं हे पर्यावरणीय आणि अर्थातच सामाजिक हितसुद्धा साधलं जाऊ शकतं.’’

- लाल महालात कसा साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा; वाचा सविस्तर!

देवधर यांनी असंही सांगितलं की, बिंदूंच्या माध्यमातून तयार केलेली सुमारे १५० व्यक्तिचित्र मी काढली आहेत. त्यांचं प्रदर्शन गेल्यावर्षी बालगंधर्व रंगमंदिरातील कलादालनात आयोजित केलं होतं. माझ्यासारख्या हौशी कलावंताला यामुळे हुरूप आला. पाच-सहा वर्षांपासून सायकलीवर लांब पल्ल्याच्या सहली करतो आहे. माझ्या शाळेतील आठ वर्गमित्रांबरोबर एकत्र येत नियमितपणे टेबल टेनिस खेळतो. योगासनं करतो आणि कुणी शिकवायला सांगितलं तर शिकवतोसुद्धा. असे माझे काही छंद माझ्यापुरते तर काही इतरांबरोबर पुरवले जात आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article nila sharma on jayant devdhar