esakal | लाल महालात कसा साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा; वाचा सविस्तर!
sakal

बोलून बातमी शोधा

Shivrajyabhishek_Lal_Mahal

छत्रपती शिवरायांनी सर्वसामान्य रयतेचे राज्य निर्माण केले. मात्र, त्यांना कुठल्याही एका जाती-धर्माच्या कोंदणात बांधून संकुचित करण्याचा कुटील डाव मांडला आहे, तो आम्ही निश्चितच हाणून पाडू.

लाल महालात कसा साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा; वाचा सविस्तर!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाल महालात प्रतिवर्षी साजरा होणारा शिवराज्याभिषेकाचा सार्वजनिक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. परंतु परंपरा कायम ठेवण्यासाठी पाच शिवप्रेमींच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक साजरा करण्यात आला. संभाजी ब्रिगेड, राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशन यांच्या वतीने लाल महालात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. 

हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही; उपमुख्यमंत्र्यांचा रुग्णालयांना इशारा​

कोरोनाच्या काळात अत्यावश्यक सेवा बजावणारे महापालिकेतील अधिकारी आशिष महाडकर, महिला नगरसेविका स्मिता वस्ते यांच्या हस्ते शिवमूर्तीला पुष्पअभिषेक आणि इंद्रायणीच्या पवित्र पाण्याने जलाभिषेक करण्यात आला.

- 'सारथी'तील विस्कळीत कारभाराबाबत मराठा संघटना काय म्हणाल्या पाहा!

हिंदू साम्राज्य दिन नव्हे तर शिवराज्याभिषेक दिनच..! 
- संभाजी ब्रिगेड

छत्रपती शिवरायांनी सर्वसामान्य रयतेचे राज्य निर्माण केले. मात्र, त्यांना कुठल्याही एका जाती-धर्माच्या कोंदणात बांधून संकुचित करण्याचा कुटील डाव मांडला आहे, तो आम्ही निश्चितच हाणून पाडू. कारण जगाच्या इतिहासात असा राजा होणे नाही, नेतृत्व, कर्तृत्व, संस्कार, प्रजादक्ष, राष्ट्राभिमान स्वाभिमान, सर्व सामान्य रयतेच्या कल्याणाचा विचार करणारा राजा, स्त्रियांचा सन्मान करणारा राजा, केवळ विचारातून नव्हे तर कृतीतून सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करण्याचं काम या महामानवाने केले. अशा जागतिक कीर्तीच्या राजाचा राज्याभिषेक हा आमच्या अस्मितेचा विषय आहे.

- पुणे- नाशिक रेल्वेबाबत खासदार डॉ. अमोल कोल्हे काय म्हणाले पाहा!

शिवरायांच्या जीवन चरित्रातून अन्यायाविरुद्ध लढण्याची मोठी प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर यांनी केले. लाल महालात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, प्रशांत धुमाळ, विराज तावरे आणि राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनचे कैलास वडघुले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

loading image
go to top