esakal | बाइकवरून चाललंय भारतभ्रमण
sakal

बोलून बातमी शोधा

Umesh-Kulkarni

पर्यटनाची आवड जपून भटकंतीचा आनंद जगणारे काही अवलिये असतात. अशांपैकी तिघांच्या सफरींविषयी जाणून घेऊया खास आजच्या (२७ सप्टेंबर) जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने.. ​

बाइकवरून चाललंय भारतभ्रमण

sakal_logo
By
नीला शर्मा

पर्यटनाची आवड जपून भटकंतीचा आनंद जगणारे काही अवलिये असतात. अशांपैकी तिघांच्या सफरींविषयी जाणून घेऊया खास आजच्या (२७ सप्टेंबर) जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने.. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक उमेश विनायक कुलकर्णी गेली चार वर्षे भारतातील वेगवेगळ्या भागांत मोटरसायकलवरून भटकंतीला जात असतात. सध्या ते नर्मदेच्या पट्टयात फिरत आहेत. उमेश म्हणाले, ‘‘मी भटक्‍या स्वभावाचा असल्याने तसाही वर्षातले सहा महिने फिरणे सुरूच असते.

पुणेकरांनी थकवले महापालिकेचे १२०० कोटी; माहिती अधिकारातून समोर आली माहिती

वर्षातून एकदा मी कामाशिवाय, नियोजनाशिवाय मोटरसायकलवर दोन आठवडे ते दीड महिना एकटाच भटकत असतो. खूप जुनं स्वप्न होतं की, बुलेटवरून भारताचे निरनिराळे प्रांत फिरून बघायचे. त्यासाठी मुद्दाम बुलेट घेतली. मनात आलं की निघतो. साधारण दिशा ठरवतो. आताही मी नर्मदेच्या पट्टयात फिरतोय, यात विशिष्ट वेळापत्रक नाही. पुण्याहून निघालो. नाशिक, जव्हार, पुन्हा नाशिक, धुळे, शहादा असं करत गुरहाळपाणी गावात आलो. मग महेश्वर, ओंकारेश्वर वगैर ठिकाणी फिरत इंदिरा सागर बांधापाशी येऊन थांबलो. पुढची भटकंती नेमकी कुठे, ते आज सांगू शकत नाही. उद्या मनात येईल, तिकडे जाणार.’’

लग्न की करिअर ? मुलींपुढे पडला प्रश्‍न​

उमेश यांनी असंही सांगितलं की, ‘‘हे असं फिरताना पुण्यातून निघायच्या आधी त्या - त्या भागातील परिचितांशी फोनवरून संपर्क साधतो. अशा प्रवासात कुणी एकदोन दिवस सोबतीला असतं कधीमधी, पण खरा भर एकट्याने फिरण्यावर. यात वेगळी मौज असते. वेगाची नशा नाही. आपल्या लयीत, संथपणे बाईक चालवत पुढे पुढे जात राहायचं. निसर्ग न्याहाळायचा. माणसं निरखायची. त्यांची बोली, खाणं, कपडे, घरं, स्वभाव आदींचं वैविध्य बघत राहायचं. हे करता करता आपल्या आत डोकावून पहायचं. स्वतःशी संवाद साधायचा. बाइक घेतली तेव्हा पहिलं भ्रमण कर्नाटकात केलं. नंतरच्या वर्षी केरळ व कोट्टायमला भटकलो. त्यानंतरच्या वर्षी गुजरात व कच्छला गेलो.’’ 

Edited By - Prashant Patil