esakal | वडील-मुलाची सायकल सफारी
sakal

बोलून बातमी शोधा

विकास मालपुटे आणि विप्लव

पर्यटनाची आवड जपून भटकंतीचा आनंद जगणारे काही अवलिये असतात. अशांपैकी तिघांच्या सफरींविषयी जाणून घेऊया खास आजच्या (२७ सप्टेंबर) जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने.. 

वडील-मुलाची सायकल सफारी

sakal_logo
By
नीला शर्मा

पर्यटनाची आवड जपून भटकंतीचा आनंद जगणारे काही अवलिये असतात. अशांपैकी तिघांच्या सफरींविषयी जाणून घेऊया खास आजच्या (२७ सप्टेंबर) जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने.. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सायकलवरून लांबचे अंतर पार करणाऱ्या विकास मालपुटे व त्यांचा मुलगा विप्लव यांची जोडी भन्नाट आहे. गेल्या वर्षी हे बापलेक पुण्याहून मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी सायकलवरून पोहोचले. तो तेरा वर्षांच्या विप्लवचा पहिलाच मोठा सायकलप्रवास होता. विकास म्हणाले, ‘‘मी व्यवसायाने फिटनेस मार्गदर्शक आहे. त्या कामासाठी आवश्‍यक त्या व्यायाम प्रकारांपलिकडले निरनिराळे प्रकार आजमावून पहायचा मला छंद आहे.

पुणेकरांनी थकवले महापालिकेचे १२०० कोटी; माहिती अधिकारातून समोर आली माहिती

मध्यंतरी गुडघ्याला दुखापत झाल्यावर त्यातून बाहेर येताना मला सायकलवरील प्रवास हा वरदान वाटू लागला. पुण्याहून लोणावळा, नगररस्ता वगैरे पन्नास ते ऐंशी किलोमीटरची सायकल रपेट मी असंख्य वेळा केली. गोव्यापर्यंत मित्रांबरोबर सायकल सफर अनुभवली. हे सगळं बघून माझा मुलगा विप्लव यानेही सायकलवरून लांब पल्ल्याची सहल करायची इच्छा व्यक्त केली. तेव्हा माझ्यासाठी ती फर्माइश ऐकणं हा आनंदाचा क्षण होता.’

'तेलंही गेलं अन् तूपही गेलं'; कर्ज मिळालं नाहीच, पण हातचे गमावले १५ लाख

विप्लवने सांगितलं की, ‘‘आपण दोघे मुंबईला सायकल चालवत जाऊया, असं मी बाबांना म्हणालो. त्यांनी लगेच माझ्यासाठी सायकल विकत आणली. आम्ही सरावासाठी आमच्या सिंहगड रस्त्यावरील घरापासून कधी खडकवासल्यापर्यंत तर कधी सारसबागेपर्यंत जायचो. रावेतला मामाकडे सायकलवरून गेलो तेव्हा मामाने कौतूक केलं. आज्जीला जेव्हा समजलं की, आम्ही पुणे - मुंबई सायकलप्रवासासाठी सराव चालवला आहे तेव्हा ती रागावली. बाबांनी तिला सांगितलं की, सोबत बॅकअप व्हॅन असणार आहे. मी आणि बाबा आपापल्या सायकलीवरून जेव्हा मुंबईपर्यंत प्रवास केला तेव्हा मला अजिबात बॅकअप व्हॅनमध्ये जावं लागलं नाही. सारसबाग ते गेट वे ऑफ इंडिया हे एकशे पासष्ट किलोमीटर अंतर मी सायकलने दहा तासांत पार केलं होतं. तो दिवस होता सोळा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस. बाबांसारखंच खूप काही करायचं आहे. 

Edited By - Prashant Patil