चोक्कस, चोंकन अन्‌ J1

Panchnama
Panchnama

रात्रीचे दोन वाजले होते. मानसीला झोप येत नसल्याने ती मोबाईलवर सफरिंग करत होती. तेवढ्यात इन्बॉक्‍समध्ये एका तरुणाने ‘J1 झाले का’? असा प्रश्‍न केला. 

त्यावर मानसीने ‘चोंकन’ असे उत्तर दिले. तरुणाला त्याचा अर्थ समजला नाही. तरीपण त्याची कळी खुलली. त्याला वाटले मुलीला गुजरातीत ‘चोक्कस’ (छान) असे म्हणायचे असावे. तरीही त्याने ‘म्हणजे काय?’ असा प्रश्‍न विचारला. त्यावर तिने चोंकनचा अर्थ ‘चोंबडेपणा करू नकोस’ असा सांगितला आणि दुसऱ्याच क्षणी त्याला ‘ब्लॉक’ केले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या पाच वर्षांत आपल्या देशात सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्‍न म्हणून ‘J1 झालं का?’ याची गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. त्या खालोखाल ‘लग्न झालंय का?’ (सिंगल की मिंगल) या प्रश्‍नाचा नंबर लागतो. अर्थात हे सारे प्रश्‍न मुलांनी मुलींना विचारलेले आहेत, हे वेगळे सांगायला नको. या प्रश्‍नांना वेळेचे व वयाचे कसलेही बंधन नाही. पहाटे पाचपासून रात्री दोनपर्यंत पुरुषांनी महिलांना ‘J1 झाले का?’ हा प्रश्‍न विचारलेला आढळून येतो.  
‘शिक्षण किती? नोकरी आहे का? आई- वडील काय करतात? या प्रश्‍नांचा पहिल्या पंचवीसमध्ये देखील समावेश झाला नाही. सध्या कोणते पुस्तक वाचतोय, हा प्रश्‍न पहिल्या हजारांमध्ये नाही, हे विशेष !

मुलं आपल्या आईवडिलांना ‘J1 झालं का?’ असं कधीही विचारणार नाहीत; पण अनोळख्या महिलांना हा प्रश्‍न पहिल्या झूट विचारतील. पन्नास जणींना हाच प्रश्‍न विचारल्यावर त्यातील एखादी तरी ‘हो झालं. तुमचं झालं का’? असं विचारेल, अशी त्याला अपेक्षा असते. हे उत्तर आलं तर आपली गाडी रुळावरून व्यवस्थित धावेल, अशी भाबडी आशा त्याला असते. पण अखिल भारतीय आकडेमोड संघटनेने केलेल्या सर्वेक्षणानुसार फक्त ००.००२ टक्के महिलांनी या प्रश्‍नाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आढळून आले आहे.

आपला राष्ट्रीय पक्षी मोर, राष्ट्रीय प्राणी वाघ तसा राष्ट्रीय प्रश्‍न म्हणून ‘J1 झालं का’? याला खरं तर मान्यता मिळायली हवी. या प्रश्‍नाचा महिलांनी इतका धसका घेतला आहे, की काही विचारूच नका. काल एक नवरा त्याच्या बायकोशी मोबाईलवर चॅटिंग करत होता. त्याने तिची प्रेमाने विचारपूस केली व शेवटी सहज म्हणून ‘J1 झाले का’? असा प्रश्‍न विचारला. त्यावर त्याची बायको इतकी भडकली की बोलायची सोय नाही. फोन करून तिने त्याला झापले. नवरा ऑफिसमधून आल्यानंतर तिचा राग धुमसत होता. तिने त्याचा स्वयंपाकही केला नाही. नवरा बिचारा पाणी पिऊन उपाशी झोपला. ‘J1 झालं का’ असा प्रश्‍न बायकोला विचारून, आपण काय चूक केली, हे त्याला रात्रभर विचार करूनही कळलंच नाही. 

बाकी काय म्हणताय? मजेत चाललंय ना आणि आपला नेहमीचा आणि आपुलकीचा प्रश्‍न ‘J1 झालं ना’? ‘जेवलंच पाहिजे’ नाहीतर जगणार कसं आणि छळणार कसं?

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com