पुण्यात घडली किळसवाणी घटना; अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 October 2020

पोलिस तिचा शोध घेत असताना मुलगी गुरुवारी दुपारी सासवड येथे आढळून आली. त्यावेळी मुलीने चार मित्रांनी तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती पोलिसांना दिली.

पुणे : पालकांशी वाद झाल्याने घराबाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून चौघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना गुरुवारी (ता.२९) उघडकीस आली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघांना गुरुवारी रात्री तत्काळ अटक केली असून अन्य दोघांचा पोलिस शोध घेत आहेत. आरोपींविरुद्ध बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पॉस्को) गुन्हा दाखल केला आहे. 

फॅमिली कोर्टमधील तत्काळ दाव्यांच्या सुनावणीला मिळणार गती; इतर प्रकरणांना 'तारीख पे तारीख'!​

याप्रकरणी 15 वर्षीय मुलीच्या आई-वडीलांनी सोमवारी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. मुलीला कोणीतरी फूस लावून तिचे अपहरण केल्याचा तिच्या पालकांचा संशय होता. त्यानुसार हडपसर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन तिचा शोध घेण्यास सुरूवात करण्यात आली होती. पोलिस तिचा शोध घेत असताना मुलगी गुरुवारी दुपारी सासवड येथे आढळून आली. त्यावेळी मुलीने चार मित्रांनी तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मुलीला उपचारांसाठी तत्काळ ससून रुग्णालयात दाखल केले. घटनेचे गांभीर्य ओळखून हडपसर पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने तपासाला गती दिली. त्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. 

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांचे निधन​

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे तिच्या आई-वडीलांशी वाद झाले होते. त्यामुळे ती रुसून तिच्या मित्राला भेटायला निघाली होती. रस्त्यात एक आरोपी तिला भेटला, त्याने मुलीच्या नातेवाईकांना ओळखत असून मी तुला तुझ्या मित्राकडे सोडतो, असे सांगून तिला एका ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर त्याने त्याच्या एका मित्राला तेथे बोलावून घेतले. त्यानेही तिच्यावर अत्याचार केले. तसेच तेथे आलेल्या आणखी दोघांनी तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती मुलीने पोलिसांना दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: minor girl abducted and gang raped by four men in Pune