बायको ही हट्टी अन् कुकरची शिट्टी!

सु. ल. खुटवड
Tuesday, 22 December 2020

‘अहो, उठा ना गाढवासारखं काय लोळताय? मिक्‍सर चालू होत नाही.’ बायकोने किचनमधून आवाज टाकला. ‘अगं मग मी काय करू? मी काय मिक्‍सर दुरुस्तीवाला आहे का?’ आम्हीही वैतागून म्हणालो. त्यानंतर किचनमधून ‘मी म्हणून टिकले. दुसरी कोणी असती तर कधीच पळून गेली असती,’ हे नेहमीचे जगप्रसिद्ध वाक्‍य ऐकू येऊ लागले.

‘अहो, उठा ना गाढवासारखं काय लोळताय? मिक्‍सर चालू होत नाही.’ बायकोने किचनमधून आवाज टाकला. ‘अगं मग मी काय करू? मी काय मिक्‍सर दुरुस्तीवाला आहे का?’ आम्हीही वैतागून म्हणालो. त्यानंतर किचनमधून ‘मी म्हणून टिकले. दुसरी कोणी असती तर कधीच पळून गेली असती,’ हे नेहमीचे जगप्रसिद्ध वाक्‍य ऐकू येऊ लागले. त्याला भांडी आदळण्याच्या आवाजाचे पार्श्वसंगीतही लाभले. त्यामुळे नाइलाजाने आम्ही व्हॉट्‌सॲपवरील चॅटिंग थांबवले. त्यामुळे आमचाही राग धुमसत होता. त्यामुळे बायकोचा कान समजून मिक्‍सरचे बटन तीन-चार वेळा पिळले. 
‘अगं लाइट गेलीय. त्यामुळे मिक्‍सर चालू होत नाही.’’ आम्ही स्विच बोर्डाची तीन-चार बटन दाबत म्हटले. 

‘अच्छा ! असं आहो होय ! तरी म्हटलं टीव्ही पण का चालू होईना. तुम्ही ताबडतोब वीज मंडळाला फोन करून, लाइट चालू करायला सांगा. आमची कामे खोळंबलीत म्हणावं. एवढं बिल भरतोय तरी लाइट जातेच कशी? त्यांना चांगलं खडसावा.’’

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अशा वेळी काय बोलावं, हे आम्हाला सुचत नाही; पण बायकोचं ऐकणं हिताचं असतं. आम्ही वीज मंडळाला फोन लावला. ‘सुधीर खारवडेकर कात्रजवरुन बोलतोय. अहो, आमच्या घरातील कामे खोळंबली आहेत. लाइट चालू करता का? वाटल्यास दहा मिनिटांनी पुन्हा बंद करा.’ आमचे हे वाक्‍य पूर्ण होण्याच्या आतच पलीकडून फोनचा रिसीव्हर आपटल्याचा आवाज आला; पण काही झालेच नाही, असे समजून आम्ही कानाला लावलेला फोन तसाच ठेवला. ‘‘बरं बरं. दहा मिनिटांनी चालू करताय का? लाइट नाही आली तर माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेवा.’ असे म्हणून आम्ही बायकोकडे पाहत कानावरील फोन काढला. योगायोगाने खरंच दहा मिनिटांनी लाइट आली. मनातल्या मनात आम्ही देवाला धन्यवाद दिले.

#nightcurfew: पुणे शहरात कर्फ्यूचं स्वरुप कसं असणार? महापालिकेनं दिली माहिती

अर्ध्या तासाने बायको म्हणाली, ‘आपण नवीनच मिक्‍सर घेऊ. लाइट नसल्यावर याचा काही उपयोग होत नाही. चला खरेदीला जाऊ.’
‘तू एकटीच जा. मला वेळ नाही.’ आम्ही सोबत येण्याचा प्रस्ताव फेटाळला. तिला फुकटचा हमाल हवा असतो, याची आम्हाला कल्पना आहे. 
‘अहो, एकटीच गेली असते; पण माझ्या चपला झिजल्यात. त्यामुळे स्कुटी चालवता येत नाही.’ बायकोने कारण दिलं.
‘काहीही काय सांगतेस. चपलांचा आणि स्कुटीचा काय संबंध.’
‘अहो चप्पल झिजल्याने स्कुटी थांबवता येत नाही. आम्हाला बाई ब्रेक लावता येत नाही. आम्ही आपले चप्पलवर काम भागवतो.’ बायकोनं खुलासा केला. त्यामुळे नाइलाजास्तव तिला घेऊन एका मोठ्या दुकानात गेलो. बराच वेळ विविध वस्तू पाहण्याचे तिचे काम चालू होते. 

महत्त्वाची बातमी : पुणेकरांनो, घाबरून जाऊ नका; संचारबंदीबाबत पोलिस प्रशासनाचे आवाहन

‘भैय्या, यह कुकर शिटीबरोबरच एक, दोन- तीन- चार बोलता है क्‍या? क्‍या होताय हमे व्हॉट्‌सॲप और फेसबुक के नाद मे कुकर के कितन्या शिट्ट्या हुया, हे ध्यान में नही रहता. अगर कुकर एक-दोन-तीन बोलता है, तो हमारा काम एकदम सोपा होगा.’ दुकानदाराने डोळे मिटले. मग काय तासभर तिने ओव्हन, वॉटर फिल्टर, कुकर अशा बऱ्याच वस्तू खरेदी केल्या. 

‘अहो, येथे मिक्‍सर चांगला मिळत नाही. आपण उद्या मॉलमध्ये जाऊन आणू.’ असे म्हणत ती दुकानाच्या पायऱ्या उतरू लागली. आम्ही मात्र तिने खरेदी केलेल्या वस्तू खांद्यावर ठेवून, रिकाम्या खिशाने पायऱ्या हळूहळू उतरू लागलो.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Write Sl Khutwad