कृत्रिम पावसाची चाचणी सुरू

योगिराज प्रभुणे
गुरुवार, 5 जुलै 2018

बारामती - पाऊस म्हणजे नैसर्गिकच असे समीकरण आपल्या डोक्‍यात पक्के बसले आहे. याला छेद देणारे कृत्रिम पावसाचे काही प्रयोग राज्यासह देशाच्या काही भागांत झाले. आकाशातून पडणारा पाऊस नेमका नैसर्गिक आहे, की कृत्रिम हे कोडे त्यातून निर्माण झाले. याचे खात्रीने उत्तर देणारी यंत्रणा हवामान खात्याने उभारल्याचे बुधवारी बारामती येथे दिसून आले. 

भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्थेतर्फे (आयआयटीएम) देशातील कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची चाचणी मंगळवारपासून घेण्यात येत आहे. त्यासाठी परदेशातून आलेली दोन विमाने सध्या बारामती येथे आहेत. या तळाला ‘सकाळ’ने भेट दिली.

या दोनपैकी एका विमानातून काळ्या ढगांच्या तळाला सोडिअम क्‍लोराईड (मीठ) किंवा कॅल्शिअम क्‍लोराईड फवारले जाणार आहे. हे मीठ ढगांमधील बाष्प शोषते. मिठाच्या कणाभोवती ढगातील बाष्प जमा होऊन त्याचा आकार वाढल्यावर त्याचे रूपांतर थेंबांत होऊन पाऊस पडतो. हे बदल दुसऱ्या विमानातून टिपण्यात येणार आहेत. त्याच्या विश्‍लेषणातून नैसर्गिक व कृत्रिम पावसातील फरक स्पष्ट करता येईल, असे या प्रकल्पाच्या प्रमुख डॉ. तारा प्रभाकरन यांनी सांगितले. 

कसे होणार विश्‍लेषण?
ढगांमधील सूक्ष्म कण, पाणी, वायू यांचे नमुने घेण्याची यंत्रणा निरीक्षण विमानात बसविली आहे. नमुने घेण्यासाठी विमानात हवामान तज्ज्ञ आणि अभियंते असतील. नमुने संकलित करण्यासाठी विमानांना विविध उपकरणे बसविली आहेत. 

असा होणार फरक स्पष्ट
    सोलापूरच्या रडारमधून क्षार फवारण्यासाठी योग्य ढगांची निवड होईल
    ढगांच्या तळाशी क्षार फवारल्यानंतरचे बदल निरीक्षण विमानांतून टिपण्यात येतील
    क्षार फवारलेल्या ढगांचा माग रडारच्या माध्यमातून घेतला जाईल
    ढगांमधील बदलांचे विमानातील उपकरणांद्वारे विश्‍लेषण
    त्यातून पाऊस नैसर्गिक आहे की कृत्रिम हे सिद्ध करता येईल 
    सोलापुरात यापूर्वी सर्वसाधारण पावसाच्या नोंदी केल्या आहेत

Web Title: Artificial Rain Testing Start