पाडळीच्या उपसरपंचपदी अरुण पापडे यांची बिनविरोध निवड

दत्ता म्हसकर
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

जुन्नर : पाडळी-बारव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अरुण प्रल्हाद पापडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपसरपंच पुष्पा बुट्टे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. सरपंच संतोष केदारी यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले.पापडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

माजी आमदार वल्लभ बेनके यांचे कट्टर समर्थक म्हणून पापडे ओळखले जातात. युवा नेते अमित बेनके,सरपंच केदारी आदींनी त्यांचा सत्कार केला.यावेळी ग्रामस्थ व सदस्य उपस्थित होते. सरपंच केदारी तसेच सर्व सदस्यांच्या सहकार्याने गावाची विकासकामे पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न राहील असे त्यांनी निवडीनंतर सांगितले.
 
Web Title: Arun Papade as the Deputy Sarpanch of Padli