
पौड : भूमिअभिलेख कार्यालयाच्या चुकीमुळे राहत्या घराच्या जागेबाबत अन्याय होत असल्याने लवळे राऊतवाडीतील (ता. मुळशी) अरुण भिकोबा राऊत हे गेली सतरा दिवसांपासून परिवारासह पौडला उपोषणाला बसले होते. पोलिस प्रशासनाची विनंती आणि आईच्या प्रकृतीचे होत असलेले हाल याचा विचार करून त्यांनी बुधवारी (ता.२५) उपोषण स्थगित केले. मात्र जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत लढा चालूच ठेवणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.