अंथुर्णेच्या सरपंचपदी अरुणा म्हस्के

राजकुमार थोरात
रविवार, 22 जुलै 2018

अंथुर्णे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉग्रेसची ची एकहाती सत्ता आहे. निवडीनंतर अरुणा म्हस्के यांनी सांगितले की, आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शक कारभार करुन गावचा जास्तीजास्त विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. निवडीनंतर गावात फटाक्यांची आतीषबाजी करुन पेढे वाटप करीत गुलालाची उधळण करीत मिरवणूक काढण्यात आली.

वालचंदनगर : अंथुर्णे (ता.इंदापूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अरुणा बाळासाहेब म्हस्के यांची बिनविरोध निवड झाली. येथील सरपंच अलका विजय शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते.

शनिवार (ता .२१) रोजी सरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. यावेळी अरुणा म्हस्के यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी गिरीश संदीकर यांनी म्हस्के यांची बिनविरोध निवड जाहीर केली. अंथुर्णे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉग्रेसची ची एकहाती सत्ता आहे. निवडीनंतर अरुणा म्हस्के यांनी सांगितले की, आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शक कारभार करुन गावचा जास्तीजास्त विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. निवडीनंतर गावात फटाक्यांची आतीषबाजी करुन पेढे वाटप करीत गुलालाची उधळण करीत मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी सरपंच अलका शिंदे, उपसरपंच उज्वला कैलास साबळे, भरणेवाडीचे उपसरपंच गुलाब म्हस्के,माजी सरपंच राहुल साबळे, नंदिनी बाळू वाघ,विशाल साबळे माजी उपसरपंच अनिता हुकूमचंद गायकवाड,अनुजा प्रकाश साबळे,मालन मोतीराम पवार,राघू गायकवाड, नाना पाटील,ग्रामपंचायत सदस्य संजय शिंदे,दशरथ शिंदे,संजय वंचाळे,दादासो झणझणे,तंटामुक्त अध्यक्ष दत्तात्रय गायकवाड,एल.के.साबळे, ,बाळासाहेब म्हस्के,प्रकाश जाधव,भरत गवळी,विजय शिंदे,बाळू वाघ,हुकूमचंद गायकवाड,कैलास साबळे,तालुका उपाध्यक्ष श्रीमंत बरळ,प्रदीप साबळे,चंद्रकांत धापटे,मल्हारी जाधव,तलाठी मिलिंद हगारे,ग्रामसेवक दिपक भोसले आदी उपस्थित होते.

Web Title: Aruna Mhaske selected sarpanch at Anthurne