अरविंद शिंदे यांना कायमस्वरुपी अटकपुर्व जामीन मंजुर 

मंगळवार, 12 मार्च 2019

पुणे : महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना धक्काबुक्की व शिवीगाळ करण्याच्या प्रकरणामध्ये महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांना न्यायालयाने अटी व शर्तींवर कायमस्वरुपी अटकपूर्व जामीन मंजूर केला. सत्र न्यायाधीश ए.वाय.थत्ते यांनी याबाबतचा आदेश दिला. 

पाषाण व कात्रज येथील तलावामध्ये जलपर्णी नसतानाही जलपर्णी काढण्यासाठी 23 कोटी रुपयांची निवीदा काढण्याच्या प्रकरणावरुन मागील महिन्यात महापौर मुक्ता टिळक यांच्या दालनामध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी आंदोलन केले होते. त्यावेळी झालेल्या आरोप-प्रत्यारोपावरून निंबाळकर यांना धक्काबुक्की व शिवीगाळ झाली होती. याप्रकरणी शिंदे, कॉंग्रेसचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्यासह 16 जणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणामध्ये पोलिसांनी धंगेकर यांचा अटकपुर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांना अटक झाली होती, तर शिंदे यांना तात्पुरता अटकपुर्व जामीन मिळाला होता. शिंदे यांना कायमस्वरुपी अटकपुर्व जामीन मिळावा, यासाठी ऍड.विजयसिंह ठोंबरे यांनी न्यायालयात अर्ज केला होता. तर सरकारी पक्षाने हा अर्ज नामंजूर करण्याची मागणी केली होती. न्यायालयाने शिंदे यांचा कायमस्वरुपी अटकपुर्व जामीन अर्ज मान्य केला. पोलिसांना तपासास सहकार्य करणे, साक्षीदारांवर दबाब न आणणे या अटींसह 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर जामीन मंजुर करण्यात आला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arvind Shinde granted permanent bail for bail